मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नव्हते याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली. रामदास स्वामी यांनी एका ठिकाणी लिहिताना शिवाजी महाराजांना माफ करा असं लिहिलं आहे. कोणता गुरू शिष्याला माफ करा असं लिहितो? असा सवाल करत राज ठाकरे यांनी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांमध्ये गुरू-शिष्याचं नातं नसल्याचं म्हटलं. ते रविवारी (१ मे) औरंगाबादमधील सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात का? रामदास स्वामी कधी बोलले होते का की ते शिवाजी महाराजांचे गुरू आहेत म्हणून. शिवाजी महाराज कधी बोलले का की रामदास स्वामी माझे गुरू होते? गुरू-शिष्याच्या नात्याचा काही संबंधच येत नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबद्दल जे लिहून ठेवलं आहे तेवढं उत्कृष्ट शिवाजी महाराजांवर लिहिलेलं मी कधीही वाचलेलं नाही.”

ramdas Athawale raj Thackeray
राज ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर आधी…आठवलेंनी सांगितला भविष्यातला प्लॅन…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
MNS manifesto Raj Thackeray , Raj Thackeray news,
परराज्यातून होणारी घुसखोरी रोखणार, मनसेच्या जाहीरनाम्यात आश्वासन
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
maharashtra assembly election 2024 there is no election campaign tour of aditya thackeray in thane district
ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही
Sanjay Raut slams Raj Thackeray (2)
Sanjay Raut on Raj Thackeray: ‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
Ramdas Athawale on Raj Thackeray
‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका
Dombivli Raj Thackeray meeting, Raj Thackeray,
डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे

“रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय की निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू…”

“रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय की निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी. त्यातील शेवटच्या तीन ओळी वाचून दाखवतो. ‘तुमच्या देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंध विस्मरण झाले, काय नेणू. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती काय सांगणे तुम्हाप्रती, परी धर्म संस्थापनेची किर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले, तेणे चित्त विभागिले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे’,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“कोणता गुरू शिष्याला माफ करा असं लिहितो?”

“रामदास स्वामी छत्रपतींना सांगत आहेत की क्षमा केली पाहिजे. मी तुम्हाला लिहिलं आहे, पण मला माफ करा. गुरू शिष्याला असं लिहितो? कुठल्या शाळेचा शिक्षक आहे मला दाखवा. मी इतके वर्षे शिकलो, मला आठवत नाही कुठल्या शिक्षकाने माझी माफी मागितली. ही माफी नाही, यात प्रेम आहे. या जातीपातीच्या विषापासून तुम्ही सर्वांनी दूर राहणं गरजेचं आहे,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

“शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी महाराष्ट्र आमच्या शिवछत्रपतींचा आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही. राष्ट्रवादीच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा.”

“कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि…”

“शरद पवार साहेब मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि कोणाचीच बाजू घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या अठरापगड जातींमध्ये तुम्ही विष कालवले. मतांसाठी कालवलेले विष शाळा कॉलेजपर्यंत गेले आहे. शाळेत मुले एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का?,” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : भोंग्याच्या मुद्द्यावर बोलत असतानाच औरंगाबादमध्ये अजान सुरू, राज ठाकरे संतापून म्हणाले, “पोलिसांनी आत्ताच्या आत्ता…”

“शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत”

“शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचं. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग मंदिरांमधील फोटो यायला लागले,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला.