स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राजा हरिश्चंद्राने स्वत:चे राज्य ऋषी विश्वामित्राला देऊन टाकल्याची आख्यायिका आहे. राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलेले ठिकाण वडवणी तालुक्यातील पिंप्री येथे असून देशातले एकमेव राजा हरिश्चंद्राचे मंदिरही याच गावात आहे. मात्र, या मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी काम मात्र १५ वर्षांपासून अर्धवट आहे.
हरिश्चंद्र पिंप्री (तालुका वडवणी) गाव राजा हरिश्चंद्राच्या नावानेच ओळखले जाते. गावापासून काही अंतरावर पुरातन मंदिर असून या मंदिरात दगडी चबुतरा आहे. ऋषी विश्वमित्राचा चबुतरा या नावाने ओळखला जातो. महाशिवरात्रीला दरवर्षी यात्राही भरते. ऋषी विश्वामित्र दंडकारण्यात तपश्चर्या करीत होते. त्या वेळी राजा हरिश्चंद्र विश्वामित्राला भेटण्यासाठी पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडवणी परिसरात आले. त्यांनी आपल्या गळ्यातील माळ विश्वामित्राचा पायावर ठेवली. त्या वेळी याच ठिकाणी स्वप्नात राज्य दिल्याची आठवण त्यांना झाली व त्यांनी आपले राजपद सोडून निघून गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी महादेवाचे छोटे मंदिर होते. ते जीर्ण झालेले मंदिर संत भगवानबाबा यांनी जीर्णोद्धार करून तेथे दगडी बांधकाम केले. त्यांच्यानंतर भीमसिंह महाराजांनी मंदिराचा विकास केला.
दरम्यान, भक्त निवासासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी २५ लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर केला. यातून पायाभरणीचे काम झाले. परंतु त्यानंतर काम झालेच नाही. १० वर्षांपासून काम अर्धवट पडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा