तुळजापूर येथील रामदरा सिंचन योजनेतील प्रकल्पात येत्या आठ महिन्यात निश्चित पाणी येईल. या कामासाठी राज्य सरकार तातडीने १०० कोटी रुपये निधी देईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली.

मराठवाडा सिंचन आढावा दौऱ्यातील पहिल्या दिवशी महाजन यांनी तुळजाभवानीच्या पायथ्याशी बांधलेल्या रामदरा तलावाची पाहणी करून ही घोषणा केली. तुळजापुरात सकाळी साडेनऊ वाजता महाजन यांचे आगमन झाले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आमदार मधुकर चव्हाण यांनी मंदिर संस्थानच्या वतीने देवीची प्रतिमा देऊन महाजनांचा सत्कार केला. महाजन यांनी अधीक्षक अभियंता बी. डी. तोंडे यांच्याकडून रामदरा प्रकल्पाची माहिती घेतली. येथे पाणी येण्यासाठी कोणत्या मार्गाने पाणी येण्याचे प्रस्तावित आहे व त्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, या बाबत माहिती घेतली. माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी सहा मागण्यांचे निवेदन महाजन यांना देऊन नळदुर्ग बॅरेज क्रमांक दोनसाठी निधीची मागणी केली. आमदार चव्हाण यांनी प्रकल्पासंदर्भात यापूर्वी केलेली कार्यवाही सांगितली. तुळजापूर तालुक्यातील शेतीला संजीवनी देणारा हा प्रकल्प असल्याचे सांगून अपुऱ्या कामांना निधी उपलब्ध करण्याची मागणी चव्हाण यांनी केली.

मराठवाडा कृष्णा सिंचन योजनेतून दुष्काळी मराठवाडय़ाच्या शेतिविषयक प्रगतीला मोठा दिलासा मिळणार आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम जारी असून पशांअभावी प्रकल्प बंद न पडता आठ महिन्यात या तलावात पाणी आले पाहिजे, असे नियोजन प्रस्तावित आहे. या शिवाय रामदरा प्रकल्पाचा पर्यटन दृष्टीने विकास करण्यासाठी योजना करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले. पुढील आठवडय़ात रामदरा तलावाच्या नसíगक वरदान लाभलेल्या स्थळाची पाहणी करण्यास पथक येईल, असे सांगून तुळजापूर विकास प्राधिकरणातील कामाचाही या निमित्ताने आढावा घेण्यात येईल, असेही महाजन यांनी सांगितले. तुळजाभवानीच्या भक्तांना मनोरंजन व विश्रांतीसाठी या प्रेक्षणीय स्थळास विकसित करण्याचा मनोदय महाजन यांनी व्यक्त केला.

नगरपालिका पाणीपुरवठा सभापती अमर हंगरगेकर व मुख्याधिकारी डॉ. राजीव बुबणे यांनी दुष्काळाच्या काळात पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी रामदरा तलावातील पाणी देण्याची मागणी केली. वीजबिल वाचविण्यासाठी ही योजना लाभदायक असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे यांनी १६ साठवण तलावांतून पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत असून त्याचा फटका शेतीला बसत आहे, याकडे लक्ष वेधले, तर युवकचे माजी अध्यक्ष विपीन िशदे यांनी पाचुंदा तलावातील गळती वर्षांनुवष्रे चालू आहे या बाबत निवेदन दिले.