भाविकांनी देवीचरणी श्रद्धेने अर्पण केलेल्या सिंहासन पेटीतील एक तृतीयांश रक्कम मंदिर संस्थानकडून बेकायदा भोपे पुजाऱ्यांना दिली जात आहे. धर्मादाय आयुक्तांच्या निकालाप्रमाणे १९७८ पासून भोपे पुजाऱ्यांना या दानपेटीतून मावेजा म्हणून वाटलेली कोटय़वधींची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
मागील ६ वर्षांपासून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. कोटय़वधी रुपये देवीच्या सिंहासन दानपेटीत जमा होतात. पूर्वी २ ते ३ सिंहासन पेटय़ा होत्या. परंतु मंदिर संस्थानने त्यांची संख्या कमी केली. भाविकांकडून या दानपेटीत जमा होणारा पसा भोपे पुजाऱ्यांना मावेजा म्हणून बेकायदा वाटप केला जात आहे. वास्तविक, हा संपूर्ण पसा मंदिर संस्थानचा आहे. परंतु सरकारदरबारी असलेल्या काही व्यक्तींकडून भोपे पुजाऱ्यांना पसेवाटप करण्यास आदेश देण्यात आला. या संदर्भात सहधर्मादाय आयुक्तांकडे अर्ज देऊन सिंहासन दानपेटीचा लिलाव बंद केला. त्याविरोधात लिलावधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने लिलावधारकांच्या विरोधात निकाल दिला.
सरकारच्या आदेशानुसार विश्वस्त, मागील सिंहासन दानपेटी घेणारे लिलावधारक यांच्यावर सीआयडी व आयकर विभागाकडून चौकशी चालू आहे. असे असताना मावेजा म्हणून दानपेटीतील पसेवाटप करणे बेकायदा आहे. तुळजाभवानी मंदिरात १६ आणे पुजारी, अधिकारी, विश्वस्त व पुढाऱ्यांचे लागेबांधे असल्याने सर्व जण मिळून तुळजाभवानी मंदिरास कुटत असल्याचा आरोप करून विधी व न्याय खात्याच्या मंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्यावी. मंदिर संस्थान आíथकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी भाविकांच्या पशांची लयलूट थांबविणे गरजेचे आहे. मंदिराच्या पशातून १६ आणे पुजाऱ्यांना मावेजा वाटप करणे बेकायदा आहे. मावेजा व दक्षिणा यामध्ये खूप मोठा फरक आहे. काम केल्यानंतर किंवा मेहनत केल्यानंतर देण्यात येणारा मेहनताना व काम केल्यानंतर देण्यात येतो तो मावेजा व दक्षिणा म्हणजेच गुरुजींनी किंवा पुजाऱ्यांने भक्तांचे धार्मिक कार्य पार पाडल्यानंतर इच्छेने दिलेले दान म्हणजे दक्षिणा. परंतु पुजाऱ्यांना मावेजा म्हणून कोटय़वधी रुपये वाटले जातात. याला जबाबदार असलेल्या सात आणे पाटील कदम व नऊ आणे मलबा, कदम, सोंजी, परमेश्वर, उदाजी, दिनोबा या घराण्याचे हक्क तपासून पाहवे व दानपेटीतील पशाची लूट होण्यास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गंगणे यांनी निवेदनात केली.

Story img Loader