छत्रपती संभाजीनगर : प्रशासनात महत्त्वाच्या पदावर सेवा बजावलेल्या मराठवाड्यातील काही निवृत्त अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचे वेध लागले आहेत. घनसावंगीमधून निवृत्त विभागीय अधिकारी मधुकरराजे आर्दड यांचे नाव चर्चेत आहे तर छत्रपती संभाजीनगर निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी तर गावभर फलक लावले आहेत.

लोकसभा निवडणुकीत प्रवीणसिंह परदेशी, राध्येश्याम मोपलवार या अधिकाऱ्यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत आणली गेली होती. आता नवी नावे पुन्हा चर्चेत येऊ लागली आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील पूर्व विधानसभा मतदारसंघात एम. के. देशमुख यांचे सध्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला हजेरी लावणार आहोत, असे एम. के. देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. जूनमध्ये एम. के. देशमुख हे शिक्षणाधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळाही चर्चेत आला होता. महात्मा गांधी मिशनच्या रुक्मिणी सभागृहात मोठ्या दिमाखात ‘सेवापूर्ती सोहळा’ पार पडला होता. या सोहळ्याला अनेक राजकीय पक्षांचे नेते आवर्जून उपस्थित होते. पंधरा दिवस आधीपासूनच ‘एम. के. देशमुख यांचा गौरवा सोहळ्या’चे शहरभर फलक लावण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांच्या निवडणूक लढण्याविषयीचे संकेत मिळत होते. आता पूर्व मतदारसंघात थेट त्यांच्या छायाचित्रासह फलकच लावण्यात आले असून, या मतदारसंघाचे आमदार, भाजपचे नेते, गृहनिर्माण तथा बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या परिसरातील देशमुख यांचे फलक चर्चेत आले आहेत.

dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
nitin gaikwad contesting election Deputy Chief Minister Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चक्क ‘क्रेन ऑपरेटर’; खात्यात केवळ दोन हजार रुपये, दीड लाखांवर कर्ज…
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

हेही वाचा – Raj Thackeray in Pune : “महाराष्ट्रात असे लोक आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत”, राज ठाकरेंचा टोला

हेही वाचा – Nitin Gadkari : “तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, एकेकाला गोळ्या घालण्याची धमकी…”; नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त झालेले मधुकरराजे आर्दड जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघात फिरत असून, आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मराठवाड्यात यापूर्वी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी राधेश्याम मोपलवार, रामदास पाटील सुमठणकर, महाराष्ट्र सरकारच्या मित्रा या संस्थेचे प्रमुख असलेले प्रवीणसिंह परदेशी या अधिकाऱ्यांचेही नाव लोकसभेच्या तोंडावर अनुक्रमे हिंगोली व धाराशिवमधून निवडणूक लढवण्याच्या इच्छुकांमधून पुढे आले होते.