महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांनी रविवारी अभिवादन केले. या निमित्त औरंगाबादसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हातात निळे झेंडे घेऊन, रॅली काढून अनुयायांनी भीमवंदनेचा गजर केला. या वेळी मोठे उत्साहाचे वातावरण होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाटय़गृहात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आधुनिक भारताचे जनक’ या विषयावर आंबेडकरी चळवळ-विचारांचे अभ्यासक रमेश िशदे यांचे व्याख्यान झाले. डॉ. आंबेडकर यांनी कधीही लेखनात, बोलताना ‘दलित’ शब्द उच्चारला नाही. या समाजाला ते ‘डिप्रेस्ड क्लास’ म्हणत असत. तथापि आपल्या मंडळींनी ‘दलित’ नावानेच संघटना, चळवळी, साहित्यनिर्मिती करण्याचा सपाटा लावला. गुलामगिरीचे प्रतीक असलेला हा शब्द कायमस्वरूपी हद्दपार करा, असे आवाहन रमेश िशदे यांनी केले. डॉ. आंबेडकर केवळ अस्पृश्य समाजाचेच उद्धारकत्रे होते असे नाही, तर भारतातील प्रत्येकाच्या हिताचा त्यांनी आत्मीयनेते विचार केला. राज्यघटना तयार करताना दूरदृष्टीने तरतूद केली. यामुळेच भारत एकसंघ राहिला, असे प्रतिपादन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास थायलंडमधील महामुक्त बुद्धिस्ट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रामपाणी रिमोल, प्रा. पाणीवारा प्राण, प्रॉड पॅनक्लँग आदींची विशेष उपस्थिती होती.
समता सैनिक दलाची मानवंदना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकल गेट येथे अ. भा. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कमांडर इन चीफ डी. व्ही. खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कमांडर अर्जुन भोईगड, जी. बी. तायडे, प्रतिभा मगरे, चंद्रकला रगडे, जया गजभिये, संगीता बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विशालनगर येथील विद्यानगर वॉर्डात शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते राजू वैद्य यांच्या उपस्थित डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत सावता माळी विद्यार्थी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून अभिवादन केले. औरंगपुरा ते भडकल गेट येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली.
रांगोळीतून साकारली प्रतिमा
उस्मानाबाद – महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील नाटय़संकुलात जम्बुद्वीप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे कलात्मक अभिवादन करण्यात आले. शिल्पकार, चित्रकार, रांगोळीकार, कोरीव कारागीर अशा विविध कलाकारांतर्फे प्रात्यक्षिकातून कलात्मक अभिवादन केले. प्रारंभी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सामूहिक वंदनेनंतर विविध कलाकारांनी कलेतून डॉ. आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा साकारून अभिवादन केले. रांगोळीकार रतिकांत मोहिते, शिवकुमार बनसोडे, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी आपल्या रांगोळीतून डॉ. आंबेडकरांची प्रतिमा रेखाटली होती. चित्रकार प्रफुल्ल माळाळे, विकास भालेराव, विशोधीज्योत चिलवंत, विकास खुने, आदित्य मस्के, अमर चिलवंत, रमेश बसोडे, शेखर बनसोडे यांनी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक चित्रे काढून अभिवादन केले. बासरीवादक परमेश्वर माने यांनी आपल्या सुरेल बासरी वादनाने उपस्थितांची वाहवा मिळविली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, रवींद्र केसकर आदी उपस्थित होते.
लातूरमध्ये अभिवादन
लातूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाऊन हॉल येथील पूर्णाकृती पुतळ्यास हजारो भीमभक्तांनी अभिवादन केले. महापालिकेच्या वतीने महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, नरेंद्र अग्रवाल, सपना किसवे, प्रदीप ठेंगल, भाजपच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मोहन माने, अनिल िशदे, राष्ट्रवादीतर्फे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, नवनाथ आल्टे, राजा मणियार, शैलेश स्वामी, काँग्रेसच्या वतीने मोईज शेख, राजकुमार जाधव, ललितभाई शहा, वैजनाथ िशदे, विक्रांत गोजमगुंडे, रिपाइंच्या वतीने चंद्रकांत चिकटे, अतिश चिकटे, दीप्ती खंडागळे, शिवसेनेचे बळवंत जाधव, संतोष सोमवंशी व रघुनाथ बनसोडे, युवराज धसवाडीकर, देवीदास कांबळे आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे जाऊन आमदार अमित देशमुख, ित्रबक भिसे, सर्जेराव मोरे, आबासाहेब पाटील यांनी आदरांजली वाहिली. रा. स्व. संघाच्या वतीने सलग सातव्या वर्षी लोकसेवा मंडळाच्या कार्यालयात रक्तदान करून अभिवादन करण्यात आले. ८८जणांनी रक्तदान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा