अजित पवारांबरोबर २०१९ मध्ये झालेला शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना केला होता. यावरून आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “भाजपाच्या दृष्टिने शिंदे गटाचा उपयोग फक्त…” काँग्रेस नेते सचिन सावंतांनी साधला निशाणा!

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

मी यासंदर्भात जास्त काही बोलणार नाही. दोघेही मोठे नेते आहेत. आम्ही त्या पातळीवर अजून पोहोचलेलो नाही. त्यामुळे या पातळीवर होणारी चर्चा नेमकी काय असते आणि ती कशी होते, हे आम्हाला माहिती नाही. त्या पातळीवर आम्ही पोहोचलो की त्यावर चर्चा करू, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी संभाजी राजांच्या स्मारकाबाबतही प्रतिक्रिया दिली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. ही चांगली बाब आहे. खऱ्या अर्थाने संभाजी राजांचा इतिहास जगापर्यंत पोहोचावा, अशी आमची इच्छा आहे. हे स्मारक इतिहासातील तथ्यांनुसार व्हावे, यात काही वादग्रस्त होऊ नये. या स्मारकामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेलं, असं हे स्मारक असांव, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी केसीआर यांच्याशी झालेल्या भेटीबाबती स्पष्टीकरण दिलं. काही दिवसांपूर्वीच केसीआर यांच्याशी माझी भेट झाली होती. तेलंगणासारख्या छोट्या राज्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या प्रकार योजना केल्या आहेत, ती समजून घेण्यासाठी ही भेट होती. यावेळी राजकीय चर्चा झाल्या नाहीत, असं मी म्हणणार नाही. मात्र, भेटीचा मुख्य मुद्दा शेतकरी आत्महत्या हाच होता, असं ते म्हणाले. तसेच २०२४ मध्ये समविचारी पक्षांबरोबर आम्ही युती करू, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – PHOTOS : फडणवीसांचा शपथविधीबाबत गौप्यस्फोट, अटकेचा दावा ते सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर संजय राऊतांची सडेतोड उत्तरं

दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले, कोश्यारींचा राजीनामा आधीच घेतला असता, तर बरं झालं असतं, ज्यांनी आपल्या छत्रपतींचा, ज्योतीबा फुलेंचा अपमान केला, अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नको होती. त्यामुळे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असे ते म्हणाले.