छत्रपती संभाजीनगर : कधी शेती समस्येमुळे तर कधी दीर्घ आजाराने एखाद्या घरातील कर्ता पुरुष आत्महत्या करतो, तेव्हा संपूर्ण घरच उघड्यावर पडते. अशा घरातील मुलांच्या शिक्षणाची परवड होते. काही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जातात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आणि जिद्दीने शिकणाऱ्या मुलांच्या साहाय्यासाठी बीड जिल्ह्यातील ‘संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था’ काम करते. ‘आधार माणुसकी’च्या उपक्रमातून गरजू १५० गावांतील ७५० ते ८०० मुलामुलींना आतापर्यंत शिक्षणासाठी मदत करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह बांधण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची गरज आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील काही भाग डोंगराळ आहे. एक पीक घेतले की, बहुतांश शेतकरी ऊसतोडणीसाठी जातात. त्यामुळे हातातोंडाशी गाठ असणाऱ्या परिवारांची संख्या जास्त आहे. एखादे मोठे आजारपण आले किंवा अपघात झाला तरी घराची परिस्थिती अधिकच खालावत जाते. घरावरचे पत्रे बदलायचे म्हटले तरी कर्ज काढावे लागते. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील हे भयावह चित्र बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, महाविद्यालयांमधील शुल्क भरताना येथील विद्यार्थ्यांची अडचण होते. अशा विद्यार्थ्यांना ‘आधार माणुसकीचा’ या उपक्रमाची मदत होते.

aimim candidate Imtiaz Jaleel
Imtiaz jaleel: इम्तियाज जलील यांच्यावर मारहाणीवरून गुन्हा
aimim Imtiaz Jaleel
Imtiaz jaleel: अतुल सावेंकडून पैसे वाटून मतदान खरेदी,…
Marathwada evm machines vandalized
हाणामारीबरोबर मतदान यंत्रे फोडली, मराठवाड्यात ६२ टक्क्यांहून अधिक मतदानाचा अंदाज
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
Cannabis worth one crore seized Chhatrapati Sambhajinagar news
एक कोटींचा गांजा जप्त
Two arrested for refraining from voting by forced payment Chhatrapati Sambhajinagar news
जबरदस्तीने पैसे देऊन मतदानापासून परावृत्त केले; दोघे ताब्यात
suresh sonawane injured
छत्रपती संभाजीनगर: गंगापूरमधील अपक्ष उमेदवार दगडफेकीत जखमी
nitin gadkari, yogi adityanath,
योगींच्या सभा लादलेल्या, गडकरींच्या मागितलेल्या!
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!

अंबाजोगाईमधील वकील संतोष पवार अशा मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यापासून ते त्यांना पायावर उभे करण्यासाठी मदत करत आहेत. ग्रामीण भागातील लहान व तरुण मुले त्यांना आवर्जून आपल्या अडचणी सांगतात. ज्या मुलांना परिस्थितीअभावी शिकता येत नाही, त्यांना कौशल्य अभ्यासक्रम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण सुटू नये यासाठी संस्थेच्या वतीने अशा मुलांना दरवर्षी जूनमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात येते. तालुक्याच्या ठिकाणी मुलांना राहण्यासाठी वसतिगृह बांधण्याचा मानस असल्याने त्यासाठी दानशुरांनी मदत करावी असे आवाहन ‘संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थे’च्या वतीने करण्यात आले आहे.

बँकिंग पार्टनर दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.