लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : मुस्लीम मतपेढी काँग्रेसकडे वळवल्याचे लक्षात येताच अल्पसंख्याक मंत्री अब्दल सत्तार यांनी टोपी फिरवली आहे. ‘लोकसभेला आमच्याकडून मदत होते. मात्र विधानसभेला भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला मदत होत नसल्याने माझ्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. म्हणून त्यांनी रावसाहेब दानवेंचे काम केले नाही,’ असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. शिवसेना शिंदे गटाबरोबर प्रासंगिक करार असल्याचे त्यांनी सांगितले.

Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA's Oath as a Maharashtra Legislative assembly Member
“मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”
Hasan Mushrif f
चूक भाजपाची अन् माफी मुश्रीफांना मागावी लागली, नेमकं प्रकरण काय? म्हणाले, “आमच्या मनातही…”

रावसाहेब दानवे जालना लोकसभेच्या जागेवर सहाव्यांदा रिंगणात होते. केंद्रात रेल्वे राज्य मंत्रिपद भूषवलेले रावसाहेब दानवे यंदा एक लाख पेक्षा अधिक मतांनी पराभूत झाले. सिल्लोड मतदारसंघ हा अब्दुल सत्तार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना सिल्लोडमधून मताधिक्य मिळू शकले नाही. त्यावर अब्दुल सत्तर यांनी आपले मत मांडले. आम्हाला विधानसभेत सिल्लोडमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मदत मिळत नाही. याची नाराजी कार्यकर्त्यांच्या मनात होती. हेच कारण धरून आमच्या ‘काही’ कार्यकर्त्यांनी यंदा त्यांचे काम केले नसल्याची कबुली सत्तार यांनी दिली.

Story img Loader