औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एकबुर्जी वाघालगाव याठिकाणी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तब्बल ६५ एकर क्षेत्रात एकाचवेळी १५ हजार वृक्षलागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड मोहिमेत गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. ‘सह्याद्री देवराई’ मोहिमेअंतर्गत सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमकडून राज्यभर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गंगापूर तालुक्यातील एकबुर्जी वाघालगाव येथील गायरान जमिनीवर ६५ एकर क्षेत्रावर विविध जातीच्या १५ हजार वृक्षांची लावगवड करण्यात आली. या मोहिमेत संपूर्ण गावाने सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. माळरानावर वृक्ष लागवडीसाठी गावातील लहान थोर सगळे उपस्थित होते.

इर्जिक फाऊंडेशन आणि एकबुर्जी वाघालगाव येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने ही वृक्ष लागवड करण्यात आली. या अभियानात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Story img Loader