शहरातील एन सहामध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यांना साडेतीन मजले बांधण्याची परवानगी होती, मात्र त्यांनी सात मजले बांधकाम केले. मंडळाने बांधलेल्या इमारतीच्या बांधकामावर कारवाईस सरकारकडे प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीत देण्यात आली. ही इमारत अवैध असल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केला.
मंजूर चटईक्षेत्रापैकी अधिकचे बांधकाम आहे काय, असा प्रश्न विचारत महापौर त्र्यंबक तुपे यांनी सहायक संचालकांना या इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्राबाबत विचारणा केली होती. सर्वसाधारण सभेतही हा विषय चच्रेत आला होता. सोमवारी पुन्हा स्थायी समिती बैठकीत एमआयएमच्या नगरसेवकांनी हा विषय चच्रेत आणला. या संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आला. या अनुषंगाने चौकशी समिती नेमली आहे, तसेच सर्वसाधारण सभेतही आदेश देण्यात आल्याने नव्याने त्यावर कारवाईचे आदेश देण्याची गरज नाही, असे मत सभापती दिलीप थोरात यांनी व्यक्त केले, मात्र नंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशामध्ये अतिरिक्त बांधकाम केल्याचे सांगण्यात आले. भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने सातमजली रुग्णालय उभारण्यासाठी बांधकाम केले आहे.
साडेतीन मजल्यांची परवानगी, बांधकाम केले सात मजल्यांचे!
शहरातील एन सहामध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यांना साडेतीन मजले बांधण्याची परवानगी होती, मात्र त्यांनी सात मजले बांधकाम केले.
Written by बबन मिंडे
First published on: 22-12-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven and half floor build in three and half sanction