|| सुहास सरदेशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नेभळट, दिवटे, बहिरे असे शब्दप्रहार करत सरकारवर टीका
केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना काहीसे सौम्य वाटणारे शरद पवार बीड येथील पक्षाच्या विजयी संकल्प सभेत कमालीचे आक्रमक होते. नेभळट, दिवटे असे शब्दप्रयोग करीत पवार यांनी पंतप्रधानांना बहिरेपण आल्याचे सांगितले. राफेल प्रकरणावरून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत भाजपकडून संभ्रम निर्माण करून देण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे झाला. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये असणारी अस्वस्थता घालविण्यासाठी शरद पवार यांनी राफेलप्रकरणी पंतप्रधानांचे समर्थन केले नाही आणि करणारही नाही, असे स्पष्टपणे सांगितले. संभ्रमाच्या गुंत्यातून सुटका करून घेताना पवारांचा आक्रमकपणा बीड येथील मेळाव्यात दिसून आला.
नापिकी, कर्जबाजारीपण त्यातून होणाऱ्या आत्महत्या याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सर्व घटक अस्वस्थ आणि दु:खी असल्याचे सांगत पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील ७१ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा उल्लेख केला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी बँकांचे आणि उद्योजकांची कर्जे कशी माफ केली हे उपस्थितांना सांगितले. पण त्यांच्या भाषणातील खरा आक्रमक भाग हा राफेलवरील संभ्रम दूर करण्यासाठी वापरला गेला. राफेलला हात घालण्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारला नेभळट म्हटले. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री पंतप्रधान मनमोहनसिंगांना प्रश्न विचारायचे, पाकिस्तानाला अक्कल शिकवली पाहिजे, झटका दिला पाहिजे असे म्हणायचे. आता परिस्थिती तशीच आहे. मग आतापर्यंत हे करता आले नाही. नेभळट माणसाच्या हातात सत्ता दिली आहे. रग असणाऱ्यांच्या हातात सत्ता द्यायला हवी, असे म्हणत त्यांनी राफेलच्या विषयाला हात घातला. लढाई करायची असेल तर चांगली विमाने लागतात. आमचे सरकार होते ( संयुक्त पुरोगामी आघाडी) तेव्हा फ्रान्सकडून घ्यायच्या विमानाची किंमत ठरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी या विमानाचा व्यवहार ६०० कोटींवरून फक्त १६०० कोटी रुपयांवर नेला. पवारांनी या वेळी वापरलेले ‘नेभळट’ आणि ‘फक्त’ हे दोन शब्द त्यांची आक्रमकता सांगणारे होते. केवळ एवढेच नाही तर राफेलच्या दुरुस्तीबाबत दिवटय़ा सरकारने केलेला करार कसा चुकीचा आहे, असेही ते म्हणाले. पवार यांनी वापरलेले आक्रमक शब्द राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांना भविष्यातील वाटचाल सांगण्यास पुरेसे असल्याने येत्या काळात राष्ट्रवादी काहीशी आक्रमक दिसेल, असे चित्र दिसून येत आहे. भाजप सत्तेत आल्यापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधावरून बरीच चर्चा अगदी जिल्हापातळीवरही होते. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बाबतीमध्ये आरोप करताना राष्ट्रवादीचे नेते कच खात. लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या बीडच्या सभेने हा संभ्रम दूर झाला आहे.
एका बाजूला आक्रमक असणारे शरद पवार यांचा जोर पक्षातील गटबाजी रोखण्यावर होता. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ होते. त्यांच्या पुतण्याला म्हणजे संदीप क्षीरसागरला राष्ट्रवादीतील एक गट चांगलेच बळ देत होता. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर मुख्यमंत्र्यांबरोबर अधूनमधून दिसत आणि त्याची राजकीय चर्चा होत असे. मुख्यमंत्र्यांच्या घरी क्षीरसागरांनी आरतीला लावलेली हजेरी त्यामुळेच चर्चेचा विषय झाला होता. बीडच्या सभेत जयदत्त क्षीरसागरच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याकडे पवारांनी लक्ष दिले नाही. पवारांनी स्वत:च्या भाषणात प्रदेश अध्यक्षानंतर उपाध्यक्ष म्हणून जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाचा दुसऱ्या क्रमांकाने उल्लेख केला. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकी निर्माण करण्यासाठी त्यांनी बऱ्याच हालचाली केल्याचेही दिसून आले.
बहिरेपण आले..
आक्रमक भाषणाच्या शैलीत पवारांनी ‘मन की बात’वरून पंतप्रधानांवर टीका केली. त्यांना ‘मन की बात’ करता येते, पण ‘जन की बात’ ऐकून घ्यायला त्यांचे कान बहिरे झाले आहेत. शेतकरी, बेरोजगार, अल्पसंख्याक, आया-बायाची बात काय हे त्यांना समजत नाही, असे म्हणत पवार आक्रमक शब्दांत व्यक्त झाले.