छत्रपती संभाजीनगर : अलिकेडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर ‘ भ्रष्टाचाराचा सुभेदार’ असे म्हणत टीका केली. पण ज्यांनी ही टीका केली त्या देशाच्या गृहमंत्र्यांना कायद्याचे उल्लंघन केले म्हणून तडीपार करण्यात आले होते. त्यामुळेच सत्ता कोणाच्या हातात द्यावी याविषयी सतर्क रहायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार केला. शेषराव चव्हाण लिखि ‘ पद्मविभूषण शरद पवार द ग्रेट इनिग्मा’ या इंग्रजी पुस्तकाचा उर्दू अनुवाद मुकदूम फारुकी यांनी केला असून त्याचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यात अनेक संघर्षाचे प्रसंग आल्याच्या आठवणी पुस्तक रुपाने लिहिल्या आहेत. त्यात विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्नही होता. ज्यांनी संविधान लिहिले त्या महामानवाचे नाव विद्यापीठास देण्यास काही चूक नव्हती. पण निर्णय घेण्यापूर्वी तरुण पिढीस विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे तेव्हा अनेक ठिकाणी हल्ले झाले. तेव्हा तो निर्णय स्थगित केला. पण पुढे महाविद्यालयात जाऊन तसेच तरुणांशी संवाद साधला आणि नामांतराचा निर्णय अंमलात आणला याचा आनंद असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. हेगडे यांनी संविधान बदलण्याबाबत विधान केले होते. त्यांना संविधान बदलण्यासाठीच ४०० हून अधिक जागा हव्या होत्या. पण देशातील जनतेने तसे होऊ दिले जाणार नाही, याचा आनंद आहे.

हेही वाचा >>>कारण राजकारण: तानाजी सावंत यांना परंडा पेलवेल?

शरद पवार यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आव्हान. मोहम्म्द अली रोडवर बॉम्बस्फोट झालेला नसताना या ठिकाणाचा जाणीवपूर्वक केलेला खोटा उल्लेख शांतता प्रस्थापित करण्यासाठी कसा उपयाेगी ठरला हे या वेळी सांगितले. या वेळी राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या बरोबर दोन पिढ्यांनी काम केले होते. त्यामुळे त्यांचे बोट पकडून आम्ही सारे शिकलो. आमचे आयुष्यच एका अर्थाने त्यांचीच देण असल्याचा उल्लेख या कार्यक्रमात केला होता. त्या भाषणातील बोट पकडण्याचा संदर्भ घेत पवार म्हणाले, ‘ मला राजेश टाेपे यांना सांगायचे आहे की, माझे बोट पकडून राजकारणात आलो असे आता म्हणू नका, या पूर्वी हे वाक्य नरेंद्र मोदीही म्हणाले होते. आता मी कोणाला बोट पकडू देत नाही. मला माझ्याबोटावर विश्वास आहे.’ त्या या वाक्याने सभागृहात एकच हशा पिकला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar criticizes amit shah regarding violation of law amy
Show comments