कोपर्डी घटनेच्या निषेधासाठी मराठवाडय़ात लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिनाभराच्या कालावधीत मराठवाडय़ात तीन दौरे केले. यामध्ये दोन वेळा ते मुक्कामी थांबले होते. उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड जिल्ह्य़ातील या दौऱ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना त्यांनी तसे लांबच ठेवले. विशेषत: अजित पवार मराठवाडय़ात फिरकतच नसल्याची बाब दिसून येत आहे. महिनाभराच्या कालावधीत पवारांच्या या चार दौऱ्यांत ‘मराठा तितुका मिळवावा’ असे प्रयत्नही जाणीवपूर्वक झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांच्या या सलग दौऱ्यांचा आणि मोर्चाचा संबंध जोडला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोपर्डी घटनेनंतर उस्मानाबादमध्ये पोलीस निरीक्षकाने केलेल्या आत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर पवार यांनी दौरा केला होता. ‘अशा घटनांमुळे समाजात अस्वस्थता वाढते आहे. त्याची सरकारने गंभीर दखल घ्यायला हवी,’ असे ते म्हणाले होते. तत्पूर्वी उस्मानाबादला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. उस्मानाबाद बंदही यशस्वी झाला. त्यानंतर औरंगाबाद येथे विक्रमी गर्दीचा मराठा क्रांती मूक मोर्चा काढला गेला.

त्यानंतर मराठा समाजाने उस्मानाबादेत स्वतंत्र गर्दीचा मोर्चा काढला. औरंगाबाद येथील मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी कोपर्डी घटनेबाबतचा ओझरता उल्लेख केला होता. दुसऱ्या दिवशी न्या. बी. एन. देशमुख यांच्या सत्काराला हजेरी लावली. ‘न्या. बी. एन.’ यांचा सत्कार म्हणजे पवार यांनी जुन्या सवंगडय़ांना बरोबर घेत ‘मराठा’ मोट बांधण्याचाच एक भाग होता, असे मानले जात आहे. पवार यांनी पळसखेडा येथे जात ना. धों. महानोर यांनी वयाची ७५ पूर्ण केल्याबद्दल होणाऱ्या सत्कार समारंभाला हजेरी लावली. याला जोडून माजलगाव येथे सुंदरराव सोळुंके यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण केले. या सगळ्या कार्यक्रमात दुसऱ्या फळीतील नेत्यांना तसे महत्त्व नव्हते.

धनंजय मुंडे यांचा अपवाद वगळता सर्व कार्यक्रमात स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन पवार यांनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. मराठवाडय़ात त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मोर्चे-प्रतिमोर्चे आयोजित होत आहेत.

मराठा मोर्चाला होणारी गर्दी आणि पवारांचे दौरे याला लक्षणीय महत्त्व आहे. पूर्वीही पवार यांचे सत्तेत असताना दौरे होत, मात्र ते एवढय़ा कमी कालावधीत ते मराठवाडय़ात सातत्याने येत नसत. महिनाभराच्या काळात त्यांच्या या दौऱ्यावरून मराठा मोर्चाला होणारी गर्दी आणि त्यावर अॅट्रॉसिटीच्या दुरुस्तीची पोळी भाजली जाते का, हे तपासण्याचा भाग असेल. समाजवादी काँग्रेसमध्ये असताना अंतुले सरकार घालविण्यास मदत करण्यापूर्वी राजकीय मोट बांधण्यासाठी पवार तेव्हा मराठवाडय़ात सातत्याने येत. तेव्हा बिगरमराठा समाजाच्या हातात नेतृत्व होते. त्याला पाडण्यासाठी आवश्यक ती ताकद त्यांनी गोळा केली. आताही ती प्रक्रिया दिसते आहे. मोर्चेकरी नावे घेत नाहीत की प्रस्थापित नेते जबाबदारी. अशा परिस्थितीत एवढी सारी ऊर्जा जिरून जाण्याची काळजी वाटते. मराठा समाजात आत्मचिंतन व अंतर्मुख होण्याची गरज उत्पन्न झाली खरी. पण त्याची राजकीय झळ बसल्याशिवाय राहणार नाही. कारण अंतिमत: सारी उत्तरे राजकारणातच असतात.’’

 – जयदेव डोळे, पत्रकार व राजकीय विश्लेषक