महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेनेच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक हजर राहिले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी जनतेला संबोधित करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. येथून पुढे जर शिवसेनेविरोधात काही बोलला तर थोबाड लाल करू, अशा शब्दांत खैरे यांनी सोमय्या यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किरीट सोमय्यावर हे फालतू असून मी त्यांना शक्ती कपूर म्हणतो, अशी टीकाही त्यांनी केली आहे. चंद्रकांत खैरेंनी पुढे बोलताना म्हटलं की, “जसा उद्धव ठाकरे यांना भाजपावाल्यांनी धोका दिला, तसाच धोका मला औरंगाबादमध्ये भाजपाने दिला. भाजपावाल्यांनी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं काम केलं आहे. किरीट सोमय्या हे सातत्याने आपलं थोबाड वाकडं करून उद्धव ठाकेरेंवर टीका करत असतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील सोमय्या त्यांचा एकेरी शब्दांत उल्लेख करतात.

त्यामुळे औरंगाबाद मध्ये येऊन किरीट सोमय्यांनी अशा प्रकारे विधानं केली तर, त्यांचं थोबाड लाल करू, अशा धमकीवजा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवेंवर देखील टीका केली आहे. भाजपानं ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंना धोका दिला, त्याचप्रकारे दानवे यांनी मला धोका दिला, त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपातील नेत्यांवर टीका केली आहे.