छत्रपती संभाजीनगर : एका बाजूला सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे धाेरण आखायचे आणि दुसरीकडे सौर वीज उत्पादित करणाऱ्या ग्राहकांना फटका बसेल, असे दरप्रस्ताव महावितरणने द्यायचे, अशा प्रकारामुळे राज्यातील सुमारे पाच हजार सौर ऊर्जा उद्योजकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या उद्योजकांनी बँकांकडून घेतलेले कर्जही थकीत राहू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकारले जाणारे दर अन्यायकारक असल्याची भूमिका

‘ऑल इंडिया रीन्युएबल एनर्जी असोसिएशन’च्या वतीने सोमवारी पत्रकार बैठकीत मांडण्यात आली. या अनुषंगाने राज्याचे अपारंपरिक ऊर्जा विकास मंत्री अतुल सावे यांना विचारले असता, या अनुषंगाने झालेल्या चुका निश्चितपणे दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

दरवाढीच्या अनुषंगाने महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे देण्यात आलेल्या प्रस्तावात सौर ऊर्जेतून निर्माण झालेले युनिट हे ग्राहक दिवसाच वापरू शकेल, अशी अट टाकण्यात आली आहे. परिणामी रात्रीच्या वेळी ग्राहकाला महावितरणची महागडी वीज वापरावी लागेल आणि त्याचे वीज देयक भरावे लागेल. सौर ऊर्जेतून दिवसा निर्माण होणारी अतिरिक्त वीज महावितरण कंपनी रु. ३ ते ३.५० प्रतियुनिट दराने विकत घेऊन त्याच ग्राहकास रु. १०-१२ प्रतियुनिट दराने रात्री विकेल. दिवसा वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना कमी वीज दराचे गाजर दाखविण्यात आले असल्याचा आरोप सौर असोसिएशनचे मयूर भांगडिया यांनी केला.

वीज दरवाढीच्या एकूण प्रस्तावास विरोध आहे. या अनुषंगाने वीज नियामक आयोगाकडून होणाऱ्या सुनावणीदरम्यान आक्षेप दाखल करण्यात येणार असल्याचे ऊर्जा मंचाचे हेमंत कपाडिया यांनी सांगितले. १ मार्च रोजी शहरातील स्मार्ट सिटी कार्यालयात ही सुनावणी होणार आहे.