छत्रपती संभाजीनगर – गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला उडवले. यामध्ये गंभीर जखमी महिलेचा मृत्यू झाला, तर ज्येष्ठ व्यक्तीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जालना रोडवरील आकाशवाणी सिग्नल चौकात मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. अपघातग्रस्त ट्रक एचपी गॅसची वाहतूक करत होता. अपघात एवढा भीषण होता की ट्रकने दोघांनाही फरफटत नेले. यासंदर्भात जिन्सी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अपघातामध्ये डोंबिवली येथील अनिता बाहेती (वय ६०) यांचा मृत्यू झाला, तर यतीराजजी बाहेती (वय ६५ ) हे जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ट्रक उलटून ८० मेंढ्या दगावल्या

बाहेती दाम्पत्याला दोन मुली असून या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरकडे येण्यासाठी त्या निघालेल्या आहेत. बाहेती दाम्पत्य छत्रपती संभाजीनगरमधील मृत एका नातेवाईकांच्या गोड जेवणासाठी येथे आलेले होते. या गोड जेवण उरकून ते जालना रस्ता ओलांडत पुढे जात होते. आकाशवाणी चौकात त्यांना एचपी गॅसच्या ट्रकने उडवले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त भुजंग साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल देवकर, सह वाहतुक कर्मचारी आकाशवाणी चौकात दाखल झाले. त्यांनी  वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, जिन्सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव सुरडकर, अंमलदार नरेंद्र चव्हाण यांच्यासह जिन्सी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच  मनपाच्या सफाई कर्मचारी व रिक्षाचालकांची  मोलाची मदत झाली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speeding truck with gas cylinders hits elderly couple while crossing the road zws