औरंगाबादमध्ये भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या क्रीडा अधिकाऱ्याचा अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय वणवे (वय ४४) असे या अधिकाऱ्याचे नाव असून १० दिवसांपूर्वी ते आजारी आईला रुग्णालयात डबा देऊन घरी परतत होते.

नागेश्वरवाडी येथे राहणारे संजय शंकर वणवे (वय ४४) हे २९ डिसेंबर रोजी आईला डबा देण्यासाठी घरातून निघाले. वणवे यांची आई रुग्णालयात भरती होती आणि तिला डबा देऊन ते घरी परतत होते. रात्री दुचाकीवरुन घरी येत असताना जालनाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने वणवे यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत वणवे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.  गुरुवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास वणवे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात कार चा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader