जगभरातील गुरुत्वाकर्षण किरणांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी करण्यासाठी नासाचे पथक एक वर्षांपूर्वी औंढा परिसरात जमिनीची पाहणी करून गेले होते. पथकाने तिसऱ्यांदा या परिसराला बुधवारी भेट देऊन पाहणी केली. अमेरीकेतील तीन शास्त्रज्ञांचा पथकात समावेश होता.
अवकाशातील लहरी व भूगर्भातील लहरी याचा गुरुत्वाकर्षण शक्तीशी काय संबंध आहे, या संदर्भात पाहणी करण्यासाठी बुधवारी अमेरिकेचे पथक औंढा नागनाथ तालुक्यातील नियोजित परिसरात आले होते. ब्रह्मांडातील विश्वतारे एकमेकांना भेटल्यानंतर अंधार होतो. यामधून सूर्यप्रकाश येत नाही. परंतु गुरुत्वाकर्षण किरणे बाहेर पडतात. या किरणांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोíनया व जपान या दोन ठिकाणी वेधशाळेची निर्मिती केली असून औंढा परिसरात जगातील तिसऱ्या वेधशाळेसाठी त्यांचा तिसरा दौरा आहे.
पथकातील अमेरिकेचे शास्त्रज्ञ तरुण सौरदीप यांनी दौऱ्याच्या निमित्ताने माहिती देताना सांगितले की, जगातील १७ देशांमध्ये अशा वेधशाळेच्या निर्मितीसाठी चाचपणी करण्यात आली. भारतात सुमारे १४ जागांची पाहणी केली. यामध्ये राजस्थान येथील जागेची निवड केली होती. मात्र, वाळवंटातील वावटळी व पाकिस्तानची सीमा त्यामुळे ही जागा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औंढा नागनाथ तालुक्यात दुधाळा परिसरातील जागा त्यापकी चौथ्या क्रमाकांवर आहे. पुणे येथील शरद गावकर यांनी या जमिनीची ११ वेळा पाहणी केली. वेधशाळेची निर्मिती करण्यासाठी सपाट जमिनीची गरज असते. येथील तुरळक चढ-उताराची जमीन सपाट करून वेधशाळेची निर्मिती करता येईल का, याची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या पथकात वेधशाळा निर्माण करणारे मुख्य अभियंता फ्रेड बेहझाद असिरी, िलगो व नासाचे फ्रेड्रिक राब यांचा या दौऱ्यात समावेश आहे.
औंढा तालुक्याच्या कोंडशीतांडा, गांगलवाडी, अंजणवाडा व दुघाळा भागातील सुमारे साडेतीनशे एकर जमीन या प्रकल्पास लागणार आहे. एल आकारामध्ये वेधशाळा उभारण्यात येणार असून पथक अमेरिकेत परतल्यानंतर िलगो या संशोधन करणाऱ्या संस्थेकडे हा अहवाल सुपूर्द करणार असून परत येथील जमिनीची पाहणी करण्यासाठी दुसरे पथक येईल, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे वेधशाळेसाठी लागणारी बहुतेक जमीन ही महसूल विभागाची असून काही शेतकऱ्यांची जमीन त्यामध्ये येणार असल्याने या बाबत पूर्वीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून नासाच्या पथकाची या परिसरावर नजर असल्याने बहुतेक ही जमीन वेधशाळेसाठी उपयुक्त ठरेल. वेधशाळेसाठी लागणारी जमीन शहरापासून दूर, तर परिसरात पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे. काही अंतरावर सिद्धेश्वर धरण असून पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो, अशी चर्चा परिसरात सुरू होती. जागेची पाहणी करण्यास आलेल्या पथकात औंढा नागनाथचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, तलाठी भुसावळे आदींचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा