शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सेनेच्या ८ आमदारांच्या पथकाने शनिवारी जिल्हय़ातील दुष्काळी भागाची पाहणी सुरू केली. उद्याही (रविवारी) ही पाहणी होणार आहे. जिल्हाप्रमुख बालाजी भोसले व संतोष सोमवंशी यांनी ही माहिती दिली.
विजय औटी यांच्या नेतृत्वाखालील पथकात शंभुराज देसाई, डॉ. बालाजी किनीकर, उदय सामंत, सुरेश गोरे, गौतम चाबुकस्वार, सदानंद चव्हाण व सुभाष भोईर या आमदारांचा समावेश आहे. पथकासोबत जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख धोंडू पाटील, माजी आमदार दिनकर माने व मनोहर पटवारी, बालाजी भोसले, संतोष सोमवंशी, डॉ. शोभा बेंजरगे आदींचा समावेश आहे. जिल्हय़ातील दहाही तालुक्यातील काही गावांना भेट देऊन शेतकरी, शेतमजूर, कामगार व ग्रामस्थांशी हे पथक चर्चा करीत आहे.

Story img Loader