धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोन जणांनी चाकूने भोसकून चहाची टपरी चालवणाऱ्याची हत्या केल्याची घटना औरंगाबादेत घडली. गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळ ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भवानीनगरातील स्मशान मारोती मंदीराजवळील बंडु शेळके (वय ३२) हे हॉटेल चालवायचे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास रिलायन्स मॉलजवळील राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरून जात होते. समोरून येणाऱ्या दोन मद्यपींचा त्यांना धक्का लागला. धक्का दिल्याचा जाब विचारला असता मद्यधूंद अवस्थेत असलेल्या दोघांनी  खिशातील चाकूने बंडु यांना भोसकले. रक्तबंबाळ अवस्थेत शेळके यांना उपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीसांनी मारेकरी रवीशंकर हरिश्चंद्र तायडे, अभिजीत चव्हाण उर्पâ चिक्या या दोघांना अटक केली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tea stall owner killed over dispute