छत्रपती संभाजीनगर : बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृताचे नाव धनंजय नागरगोजे असे असून, ते केज तालुक्यातील केळगाव येथील विना अनुदानित आश्रम शाळेत मागील १८ वर्षांपासून कार्यरत होते.

धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या तीन वर्षाच्या मुलीला एक चिठ्ठी लिहून आश्रमशाळेशी संबंधित सहा जणांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे कारण नमूद केले आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारूती खेडकर यांच्याकडून सांगण्यात आले की, घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नसून, त्या संदर्भाने तक्रार आली तर पोलीस पुढील कारवाई करतील. धनंजय नागरगोजे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.

Story img Loader