शिक्षितांनी अशिक्षितांना शिकवणे हेच खरे समाजकार्य असून या कामी समाजातील शिक्षित व धनिकांनी सहभाग वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी व्यक्त केली.
विविध अनाथालयांतील मुला-मुलींसाठी आयोजित ‘उमंग’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बेदी यांनी तिहार कारागृहात राबविलेल्या शिक्षणविषयक उपक्रमांची माहिती या वेळी दिली. तिहार कारागृहात अधीक्षक असताना जुन्या पुस्तकांचा वापर करून कैद्यांना शिकवले. या कामी कारागृहातील शिक्षित कैद्यांची साथ मिळाली. पुस्तकांचे वाचन हाच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा मूलमंत्र असला पाहिजे. अनाथालयातील मुलांच्या मनात आपल्यासाठी कोणीही नाही अशी भावना निर्माण न होऊ देण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. पगारिया ऑटोतर्फे आयोजित या कार्यक्रमात दीड हजार अनाथ मुला-मुलींच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना पुस्तके देऊन गौरविण्यात आले. पुखराज पगारिया, महिला व बालविकास उपायुक्त संगीता लोंढे, राहुल पगारिया यांची उपस्थिती होती. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा