छत्रपती संभाजीनगर : ‘जपान डायरीज्’ या विशेष कार्यक्रमातून भारत व जपान या दोन देशांमधील सांस्कृतिक मैत्रीचे दर्शन घडले. येथील नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजीच्या (एनएसबीटी) तिसऱ्या वार्षिक स्नेहमेळाव्यांतर्गत आयोजित कार्यक्रमात जपानहून आलेले आणि देशातील प्रमुख मान्यवरांनी वरील भावना व्यक्त केली. या कार्यक्रमामध्ये जपान इमर्शन प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या जपानी संस्कृती, प्रशासन व व्यवसायाभिमुखता प्रभावी करण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

या वेळी यामानी सान, तसेच त्रिशित बॅनर्जी व स्वस्तिका जाजू हे खास जपानहून आवर्जून आले होते. संस्थेचे संचालक हर्षवर्धन जाजू यांनी भारत आणि जपान या दोन वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पूल बांधण्याच्या प्रयत्नाचा कार्यक्रम एक भाग असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर दृष्टिकोनाची माहिती दिली. माजी केंद्रीय मंत्री श्री. के. जे. अल्फोन्स यांनी आत्मविश्वास व सकारात्मकता जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात संस्थेचे पाच विद्यार्थी – दिशा दुसाद, सृष्टी गुप्ता, श्रेया मुळे, हित पटेल, हरराज धोडी आणि प्रो. डॉ. संवेदी राणे यांनी जपानमधील त्यांचे अनुभव कथन केले.