औरंगाबादमधील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर भागात राहणाऱ्या कुटुंबावर चोराने मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पारस छाजेड यांच्यासहित त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोर चोराला अटक केलं आहे. ही घटना बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुराणा नगर भागात प्रोटॉन पंपचे मालक पारस छाजेड आपल्या कुटुंबासहित राहतात. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंगल्याची डोअर बेल वाजली. पासर छाजेड यांनी दरवाजा उघडताच चोराने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने भेदरलेल्या छाजेड यांनी आरडाओरड सुरु केला. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा बाहेर येताच चोराने त्यांच्यावरही हल्ला केला.

आवाज ऐकून शेजारी धावत येत असल्याचं पाहताच चोरटा घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना परिसरातील नागरिकांनी तातडीने अपेक्स रुग्णालयात दाखल केले आहे.

Story img Loader