छत्रपती संभाजीनगर : तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि या सर्व प्रकरांकडे होणारे सरकारी दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला. 

भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष तपास पथकाची नेमणूक का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न परीक्षार्थी आंदोलकांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी नगरमधील क्रांती चौकात हजारोंच्या संख्येत जमलेल्या परीक्षार्थीनी शासनाच्या भरती प्रक्रियेतील अनागोंदीचा निषेध नोंदवला. छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच बीड येथेही परीक्षार्थीनी ‘सरकार गैरप्रकारांची चौकशी का करीत नाही,’ असा प्रश्न उपस्थित केला. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० दरम्यान परीक्षार्थीनी हे आंदोलन केले.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर? ठाकरेंच्या आरोपांनतर नार्वेकर म्हणाले…

आम्ही कोणाच्या विरोधात नाही. सरकारच्याही विरोधात नाही. मात्र, परीक्षा पारदर्शकपणे व्हायला हव्यात, असे स्पर्धा परीक्षा पेपर फूटविरोधी कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले. तलाठी भरतीमध्ये पुन्हा गैरव्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे विद्यार्थी कसे जमव णार, असा सवाल परीक्षार्थीनी केला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चुकीचे सांगत आहेत. सरकारने शंका दूर करणे आवश्यक आहेच, पण भरती प्रक्रिया राबवण्यासाठी खासगी कंपन्यांचा एवढा अट्टहास कशासाठी, असा सवालही परीक्षार्थी आंदोलकांनी केला.

आंदोलकांवर गुन्हे

बीड शहरात सार्वजनिक रस्ता बंद करून रहदारीत अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या धनंजय गुंदेकर, राहुल कांबळे, राहुल कवठेकर आणि सचिन ठेंगळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरती विरोधात संशय निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता.

परीक्षार्थीच्या तक्रारी..

* भरती प्रक्रियेसाठीचे शुल्क भरमसाठ.

* आरोग्य भरतीसाठी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे.

* तलाठी भरतीच्या २०० गुणांच्या पत्रिकेतही गैरव्यवहार.

* भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही?

आई- वडील शेतात राबून पैसे पाठवतात. शुल्कापोटी लाखो रुपये खर्च केले. सरकार गैरप्रकारांची चौकशी का करत नाही? – सोमनाथ पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का परीक्षा घेतली जात नाही? पारदर्शकपणे परीक्षा घेता येऊ नयेत, याचे आश्चर्य वाटते. – पवन नरसाळ