छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील तिहेरी लढ्यातील बहुरंगी प्रचारात विजयाचे सूत्र जातीच्या समीकरणात दडले आहे. या निवडणुकीमध्ये प्रचारात ‘ खान की बाण’ नव्हता. पण मतदानाच्या पारूपात तो होताच. एकगठ्ठा मुस्लीम मते ‘ एमआयएम’ च्या पारड्यात पडतील अशी भीती दाखवून महायुतीने प्रचाररंग बदलला. नव्या प्रारूपात शिवसेनेने बदलेल्या भूमिकेमुळे ‘मुस्लीम मतां’मध्ये फूट पडेल का, या प्रश्नाभोवती उमेदवारांच्या विजयाचे अंदाज बांधले जात आहेत. मतदान झाल्यानंतर फटाके फोडून आणि ढोल वाजवून विजयापूर्वीच ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला. पण निकालापूर्वीचा हा जल्लोष कदाचित ‘चूक’ ठरेल, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जात आणि धर्म या मुद्दयांभोवती रंगलेल्या निवडणुकीत विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचे अंतर फार तर दहा हजार असेल, असे सांगण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा