शहरातील सिद्धार्थ उद्यानातील वाघाचा गूढ मृत्यू झाला आहे. गुड्ड नावाच्या या वाघाला रात्री जेवण दिल्यानंतर सकाळी मात्र तो निपचित पडल्याचे कर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यानंतर तत्काळ देता येतील, अशी औषधे मागविण्यात आली. मात्र, तत्पूर्वी या वाघाचा मृत्यू झाला होता. मृत वाघाच्या उत्तरीय तपासणीनंतर नक्की कोणत्या कारणाने मृत्यू झाला हे समजू शकणार आहे. त्यासाठी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांना नीटपणे अन्न दिले जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह होते, असे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सांगितले.
शहरातील दोन वाघांना नुकतेच मध्य प्रदेशात हलविण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयात आता ६ वाघ आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्यानातील प्रश्न गुंतागुंतीचे बनत चालले आहेत. ज्या िपजऱ्यात प्राणी ठेवले जातात त्याची देखभाल नीट होत नाही. काही िपजरे तर अक्षरश: तुटण्याच्या स्थितीत आहेत. प्राण्यांची नीट काळजी घेत नसल्याचे दिसून आले होते. विशेषत: अन्नाचा दर्जा नीट नव्हता, अशा तक्रारी आल्या होत्या, असे उपमहापौर राठोड यांनी सांगितले. वाघाच्या मृत्यूमुळे महापालिका प्रशासनातील त्रुटींकडे लक्ष वेधले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा