श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, तसेच गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या मदतीसाठी उद्या (शनिवारी) व रविवारी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सवाचे हे १४ वे वर्ष आहे.
उद्या सकाळी साडेदहा वाजता किरण बेदी यांचे ‘हमें सजग नागरिक बनना हैं, नवराष्ट्र निर्माण करना हैं’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता पहिल्या सत्रात पुणे येथील दिलीप काळे यांचे संतूरवादन, तर दुसऱ्या सत्रात पं. नाथराव नेरळकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता दीपा व लक्ष्मीकांत काळे ‘स. भु. शताब्दीपर्व संगीत मैफल’ हा मराठी व हिंदी गीतांची सुरेल मैफल सादर करणार आहेत. स. भु. महाविद्यालयाच्या पटांगणावर हे कार्यक्रम होणार आहेत.

Story img Loader