शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून(रविवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. तसेच त्यांनी पेंढापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : काही झालं तरी धीर सोडू नका, आता रडायचं नाही लढायचं – उद्धव ठाकरेंचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन

“शेतकऱ्यांवर ज्या आपत्ती येतात त्या दोन प्रकारच्या असतात, एक कोरडा दुष्काळ असतो तर एक अतिवृष्टीची आपत्ती असते. हे आपल्या हातात नसतं परंतु ही अस्मानी संकटं आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावर पडता कामानये. परंतु आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेण या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे २४ मिनिटे शेतकऱ्यांची विचारपूस करणार, आता यावेळेत ते…”; अब्दुल सत्तारांनी साधला निशाणा!

पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आजची माझी भेट ही प्रतिकात्मक आहे. एका विचित्र अवस्थेत आपण सर्वजण आहोत. एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे. दिवळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिवजवायचं? हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. मी का मुद्दाम आलो. केवळ आज विरोधी पक्षात आहे म्हणून मी आलेलो नाही. तर या शेतकऱ्यांचं ऋण आपल्यावर आहे, नेहमीच असतं. महाविकास आघाडीच्या काळात साधरण दोन-अडीच वर्ष करोनाने आपली खाल्ली, सर्वत्र लॉकडाउन असताना, आपल्या अर्थव्यवस्थेला जर कोणी आधार दिला असेल तर आपल्या अन्नदात्याने दिला आहे. कृषी क्षेत्राने दिला आहे कारण तिथे लॉकडाउन करता येणं शक्य नव्हतं. जर शेतकरी तेव्हा राबला नसता, तर आपल्या आर्थिक परिस्थितीचं सुद्धा दिवाळं निघालं असतं.”

“त्यांनी नक्कीच रस्त्यावर उतरावं, रस्त्यावर उतरण्याचीच वेळ आली आहे; ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, त्यावेळी…”

याशिवाय, “पावसाची सुरुवात ही चक्रीवादाळाने होते. त्यानंतर मग संततधार, अतिवृष्टी ढगफुटी होते. मागील आठ-दहा दिवसांपूर्वी पुण्यातही अतोनात पाऊस पडला. रस्ते तुंबले घरात पाणी गेलं. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलं नाही असा भाग नाही. कारण, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहे, तर त्यांनी उत्तर दिलं की पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. त्याचप्रमाणे ते इथल्याबाबतीतही म्हणतील की शेतात आणि ग्रामीण भागात पाऊस किती पडावा हे सरकारच्या हातात नसतं.” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हणत राज्य सरकारवर टीका केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today there is only heavy rain of slogans and this ruthless government has a drought of emotions uddhav thackeray criticizes shinde fadnavis government msr