छत्रपती संभाजीनगर, पुणे : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी देशातील अनेक बाजारपेठांत दोनशे रुपये किलोपर्यंत दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या दरांनी तळ गाठला असून टोमॅटोला घाऊक बाजारात दोन ते चार रुपये किलोचा दर मिळू लागला आहे. यातून मालाच्या ने-आणीचा वाहतूक खर्चही निघू शकत नसल्याने टोमटो गुरांना खायला घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोप्रमाणेच वांगी, दोडके, शिमला मिरची आदी भाज्यांच्या दरांतही वेगाने घसरण होत असल्यामुळे या भाज्यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्च निघणार कसा, हा प्रश्न उभा राहिला आहे.

महिनाभरापूर्वी लाखोचे उत्पन्न देणारे टॉमेटोचे पीक आता शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीचे ठरू लागले आहे. पुणे, नारायणगाव आणि नाशिक बाजार समितीत टोमॅटोची मोठय़ा प्रमाणात आवक होऊ लागल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहा ते आठ रुपये किलो असा दर मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर टोमटोला दोन ते चार रुपये किलो इतका दर मिळत  आहे.  गंगापूर तालुक्यातील दामोदर हिवाळे यांना तर २८ कॅरेटसाठी केवळ १२५ रुपये मिळाले. दामोदर हिवाळे म्हणाले, एप्रिलमध्ये लागवड केली. त्यानंतर जूनपर्यंत भाव वाढत गेले. अगदी मोजकेच दिवस चांगलाच भाव मिळाला आणि आता परिस्थिती बिघडली आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद

कन्नड तालुक्यातील नर्सरीमधून आणलेल्या रोपांवर आणि औषधांवर त्यांनी दीड लाख रुपये खर्च केला. एवढा खर्च केल्यानंतर हाती दीडशे रुपये मिळत असतील, तर काय करायचे, असा सवाल त्यांनी केला. काही दिवसापूर्वी टोमॅटोच्या दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता. आता पुन्हा दर गडगडल्यानंतर कोणतेच सरकार हस्तक्षेप करीत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. वाशी एपीएमसी बाजारात १०रुपये दराने टोमॅटो विक्री होत असला तरी शेतकऱ्यांना प्रतिकिलो वाहतूक, हमाल, तोलाई इत्यादी ५ रुपये खर्च होऊन केवळ ३-५रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले असून प्रतिक्रेट ३००रुपये तरी दर मिळावेत असे मत शेतकरी अर्जुन खराडे यांनी व्यक्त केले.

राज्यभरात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेततळय़ांत पाणी नाही. अशा स्थितीत भाजीपाल्याचे पीक घेणे कठीण बनले आहे. त्यातच टोमॅटोसह अन्य भाज्यांचे दरही गडगडल्याने शेतकरी धास्तावला आहे. दोडक्याला साधारण दहा ते पंधरा रुपये प्रति किलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे. किरकोळ बाजारात हे दर २० ते ३० रुपये किलो आहेत.  शिमला मिरचीलाही दहा ते ३० रुपये किलो इतकाच दर मिळत असून वांग्याच्या दरातही घसरण झाल्याचे चित्र आहे. 

मुंबईतही आवक वाढल्याने दरांत घट

  • ऑगस्ट अखेरपासून टोमॅटो आवक वाढली असून त्यात केंद्र सरकारने टोमॅटो आयात केली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत टोमॅटो आवक अधिक असल्याने दर कोसळले आहेत.
  • मागील आठवडय़ात एपीएमसी बाजारात प्रतिकिलो १२-१४ रुपयांनी विक्री होणारे टोमॅटो सोमवारी मात्र ५-१० रुपयांनी विक्री झाले आहेत तर शेतकऱ्यांना ३-५ रुपये दर मिळत आहे.
  • अचानकपणे टोमॅटोच्या दरात घसरण होत असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रातून अधिक टोमॅटो आवक होत असून सोमवारी एपीएमसीत ४३ गाडय़ा दाखल झाल्या असून १९७७ क्विंटल आवक झाली आहे.