बिपीन देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औरंगाबाद : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे लिखित कथा, कादंबरी, वग-नाटय़, शाहिरीसह त्यांच्यावर इतर लेखक, अभ्यासकांनी लिहिलेल्या साहित्याचे सात खंड मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याच्या संदर्भातील कामकाज सध्या राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीत थांबले आहे.

अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीकडून कादंबऱ्यांचे दोन खंड यापूर्वी प्रकाशित झाले असले तरी त्याच्या प्रती आता शिल्लक नसल्याने पुनर्मुद्रण व उर्वरित खंडांच्या प्रकाशनाचे कामकाज नव्या सरकारने अनेक समित्या बरखास्त केल्यामुळे रखडले आहे. अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समिती सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा भाऊंच्या एकूण ३२ कादंबऱ्या असल्या तरी त्यातील ३१ कादंबऱ्यांना तीन खंडांमध्ये प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पैकी दहा-दहा कादंबऱ्यांचे दोन खंड प्रकाशित झाले आहेत.

 कादंबऱ्यांचे तीन, कथांचे दोन, शाहिरी- वग-नाटय़ाचा एक व एक खंड अण्णा भाऊंवर लिहिलेल्या लेखांचा खंड, तसेच एक चरित्र व एक गौरव अंकही समितीकडून प्रकाशित करण्यात येणार होता. यातील दोन कादंबऱ्यांचे खंड तेवढे प्रकाशित झाले आहेत. उर्वरित काम थांबलेले आहे, अशी माहिती समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. माधव गादेकर यांनी दिली.

उच्च व तंत्र विभागाचे मंत्री हे समितीचे अध्यक्ष असतात. ते सध्या नसल्यामुळे समितीच्या कामकाजाचा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.  कादंबऱ्यांचा तिसरा खंड व कथांचा एक खंड, ध्वनिमुद्रित साहित्य व ई-बुक, असे सर्व १ ऑगस्ट रोजी वाटेगावला प्रकाशित करायचे नियोजन ठरले होते. सध्याच्या परिस्थितीत  धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. 

– प्रा. डॉ. संजय शिंदे, सदस्य सचिव, समिती