धाराशिव : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात रविवारी सहाव्या माळेला देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. महिषासूराचा वध करतानाचे देवीचे रौद्ररूप दिवसभरात हजारो भाविकांनी पाहून देवीचे दर्शन घेतले.
हेही वाचा : शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
रविवारी सकाळी नित्योपचार पूजा, धार्मिक विधी पार पडल्यानंतर कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी अलंकारम महापूजा मांडण्यात आली होती. या पूजेला असलेल्या धार्मिक महात्म्यानुसार, साक्षात पार्वती असणार्या जगदंबा तुळजाभवानी मातेने दैत्यराज असणार्या महिषासुराचा वध केला. त्यामुळे महिषासूरमर्दिनी या स्वरुपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते. दरम्यान शनिवारी रात्री पाचव्या माळेला रात्री पितळी गरूड या वाहनावरून देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मानकरी, पूजारी, महंत उपस्थित होते.