छत्रपती संभाजीनगर – प्रती मतदानाचे प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे एका मतदारास बळेच पैसे देऊन व त्याच्याकडील आधार कार्ड व मतदान कार्ड जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर परिसरात  नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी पैसे देणारा व घेणाऱ्या मिळून दोन रिक्षालकाविरोधात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस व एफएसटी पथकाने दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी दिली.

इंदिरानगर मधील पटेल किराणा दुकानासमोर १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता अशोक रामभाऊ वाकुडे (वय ३८, रा. शंभुनगर) याने नदीम अहमद खान पठाण, (वय ४५ वर्षे, रा. पटेल किराणा दुकानासमोर) यास विधानसभा निवडणुक मध्ये कोणत्याही उमेद्वाराला मतदान करु नको म्हणून बळजबरीने त्याचा मतदान करण्याच हक्क हिरावून घेतला. त्या बदल्यात जबरदस्तीने दोन मतदान करीता दोन हजार रुपये दिले. तर नदीम अहमद खान पठाण व त्याची पत्नी याचे मतदान कार्ड व आधार कार्ड जबरदस्ती ताब्यात घेतले. त्यांना मतदान करण्यापासून परावृत्त केले.

defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
News About Batenge to Katenge Slogan
Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
Details of election expenses of candidates in Nagpur
उमेदवारांचा खर्च : काहींची काटकसर, काहींचा मोकळा हात

हेही वाचा >>>छत्रपती संभाजीनगर: गंगापूरमधील अपक्ष उमेदवार दगडफेकीत जखमी

सोमवारी रात्री जवाहरनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरमाळे व एफएसटी पथकांचे रविकीरण जिजाभाऊ चव्हाण, जालिदंर जरा-हाड, प्रशिक भिवसेन व संदीप सुरडकर यांनी मतदान कार्ड व आधार कार्ड जमा करुन मतदान दिवशी मतदान केले नाही तर मतदान न करण्याचे दोन हजार  रुपये देणा-या व मतदान करण्यास मज्जाव करणा-या अशोक वाकुडे व नदीम अहमद खान पठाण या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला.