राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या शुक्रवारच्या छत्रपती संभाजीनगर भेटीनंतर अवघ्या १२-१५ तासांच्या अंतराने खुनाच्या दोन घटना ईटखेडा व हडकोमधील नवजीवन कॉलनीत घडल्या. ईटखेडा परिसरातील अतुल खाडे खून प्रकरणात आरोपींपैकी तीघांना सातारा पोलिसांनी शनिवारी दुपारी बेड्या ठोकल्या. तिघांनाही ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मुसळे यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहन ज्ञानेश्‍वर बनकर ऊर्फ  गोट्या (१९), वैभव अतुल उगले ऊर्फ  राधे (१८), सुशांत दिपक उपदेशे (१९, तिघेही रा. मिलिंदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी विशाल कळकुंभे आणि सागर मिलींद जाधव (रा. उस्मानपुरा) यांना  सायंकाळी परतुर येथून अटक केली. प्रकरणात मृत अतुल खाडे (२९, रा. ईटखेडा) याची आई शशिकला बाबासाहेब खाडे (४४) यांनी फिर्याद दिली. तर हडकोतील खून प्रकरणी महत्त्वाचे धागे हाती लागल्याची माहिती आहे.