छत्रपती संभाजीनगर – समृद्धीवर महामार्गावरील  हर्सूल-सावंगी परिसरात ट्रकला पाठीमागून भरधाव कारने शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर एक गंभीर जखमी आहे. चालक सुखरूप आहे. मृत दोघे हे ३५ व ४० वयोगटातील तरुण असून ते भंडारा शहरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा >>> अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Best Bus accident, Inquiry committee BEST,
Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तातडीची मदत, बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समिती स्थापन
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक

आशिष सरवदे (३७, भंडारा) हे गंभीर जमखी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालक रितेश भानादकर (२४) हा सुखरूप असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. भंडाऱ्यातील चौघे कारने (क्र. एमएच ४३, एएल ८०२१) मुंबईला गेले होते. ८ मार्च रोजी ते भडाऱ्याकडे परतत असताना त्यांची कार समृद्धी महामार्गाने चॅनल क्र. ४३६ जवळ आली तेव्हा समोर लोडिंग ट्रक (क्र. सीजी १५, डीबी ७१५८) जात होता. ट्रक त्याच्या लेनमधून धावत होता. घाटासारखा रस्ता असल्याने ट्रकची गती मंद होती. त्या ट्रकवर पाठीमागून भरधाव कारने धडकली.

Story img Loader