छत्रपती संभाजीनगर : लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शन करून परत येताना वाहन पुलाला धडकून झालेल्या अपघातात दोन ठार तर दोघे जखमी झाले. ही घटना मांजरसुंबा-अहिल्यानगर मार्गावरील मुळुकवाडी फाट्यावर शनिवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेतील मृत दोघेही डॉक्टर असल्याची माहिती समोर येत आहे.
मृणाली शिंदे (वय 32), ओंकार चव्हाण, अशी मृतांची नावे तर, मंथन चव्हाण व ऐश्वर्या चव्हाण हे दोघे जखमी असून, त्यांना बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघेही परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील रहिवासी आहेत, अशी माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी दिली.
प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर मंथन माणिकराव चव्हाण व डॉक्टर ऐश्वर्या मंथन चव्हाण यांचे नुकतेच 4 फेब्रुवारी रोजी लग्न झाले असल्यामुळे ते दोघेजण आणि डॉ. मृणाली शिंदे आणि डॉ. ओंकार न्यानोबा चव्हाण असे चौघे जण देवदर्शनाला निघाले होते. जेजुरी येथून परत येत असताना बीड तालुक्यातील मांजरसुंबा जवळ त्यांचे चार चाकी वाहन मुळुकवाडी परिसरातील एका पुलाच्या कठड्याला जाऊन धडकले. अपघात होऊन या अपघातामध्य डॉ. ओंकार चव्हाण आणि डॉ. मृणाली शिंदे यांचा मृत्यू झाला.