लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : दोन दुचाकींच्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना बिडकीनजवळील कौडगाव-ताहेरपूर परिसरातील रेणुकामाता मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. अशोक भालेराव (वय ३६, रा. मिसारवाडी) व नामदेव डफाळ (वय ३५), अशी मृतांची नावे आहेत. तर नंदाबाई लहू पाखरे (वय ५०) व अनिता डफाळ या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
आणखी वाचा-शेतकरीसरकारच्या कात्रीत बँका; ‘सिबिल’ न पाहता कर्ज देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव
डफाळ पती-पत्नी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना भालेराव यांच्या दुचाकींचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच बिडकीनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जख्मीना बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे अशोक भालेराव व नामदेव डफाळ यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वेदपाठक यांनी मृत घोषित केले. गंभीर जखमी महिलांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णायामध्ये पाठवण्यात आले.