छत्रपती संभाजीनगर : शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले. ही घटना पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील शेकटा शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. प्रणव दीपक दाभाडे (वय ०७) व आरुष दत्तात्रय दाभाडे (वय ०५), अशी मृत मुलांची नावे आहेत.

आकाश अशोक गावंदे (१३) याला वाचवण्यात यश आले. हे तिन्ही मुले मदन गवांदे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागली. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने महिलांनी धाव घेतली. त्यांनी साडी पाण्यात सोडली. त्याला पकडून आकाश वर आला, पण प्रणव व आरुष ही दोघे बुडाली. या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात, अशी माहिती कांचनवाडी अग्निशमन विभागाचे अधिकारी विनायक कदम यांनी दिली.

Story img Loader