केंद्रात शेतकरी कायदा आणल्यावर उत्तरेतील शेतकरी रस्त्यावर आले होते. अद्यापही लोकशाहीतील दम गेलेला नाही. शिवसेना प्रमुखांनी जय जवान, जय किसान, जय कामगार हा नारा दिला होता. तुमच्या कष्टावर आणि घामावर देश उभा आहे. तुम्ही म्हणाल, तर आम्ही राज्यकर्ते आहोत. राज्यकर्त्यांनी देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम करायला हवं. पण, ती दिशा चुकून दुर्दशेकडे जात असेल, तर आम्हाला तुम्हाला घरी पाठवण्याचं काम करावं लागेल, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : “…तर तुम्ही मिंध्यांचं काय चाटलं”, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल!

“अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूरमध्ये आलो होतो. शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली की, नाही माहिती नाही. आता अवकाळी आणि गारपीटीमध्ये सर्व पीके सुफडासाफ झाली. महाविकास आघाडीचं सरकार असताना बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न होता. या सरकारने पीकविम्यासाठी फक्त १ रुपया भरा, बाकी पैसे आम्ही देऊ असं सांगितलं. काय दानशूर सरकार आहे. मात्र, जेव्हा शेतकरी पीकविम्याने पैसे मागण्यासाठी जातात, तेव्हा त्यांच्या हातावर १० रुपयांचं चेक देण्यात येतो,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा : “मग पदवीचा उपयोग काय…”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

“शेतकरी एवढे हफ्ते भरतात, ती पीकविमा कंपनी कोणाची आहे? अडाणींची आहे… सर्वकाही तुम्ही मित्रासाठी करत आहात… मग शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकत आहात? आम्ही फसवा-फसवीचं धंदे केले नाहीत आणि करणारही नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा २ लाख रुपयांचं पीक कर्ज माफ केलं होतं,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attacks pm narendra modi adani company over farmer insurance ssa
Show comments