औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात संभाव्य परिणामांवर शिवसैनिकांमध्ये चर्चा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकसत्ता : शिवसेना नावासह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने ‘खान की बाण’ या प्रचारतंत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हे घोषवाक्य जरी वापरले गेले नाही, तरी प्रचाराचा रंग शिवसेनेला कायम ठेवता येतो का, याविषयीही शंका घेतल्या जात आहेत. औरंगाबाद, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे परिणाम जाणवतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेचे नेते ही बाब नाकारतात.

सैन्यातील देशभक्त औरंगजेब आमचा आणि औरंगाबादच्या नावातील आलमगीर औरंगजेब नाकारण्याच्या नव्या वैचारिक पटलावर ‘खान की बाण’ या सूत्राच्या पुनर्रचनेची उत्सुकता वाढू लागली आहे.

 ‘खान की बाण’ या प्रचारतंत्रातील एक महत्त्वाची कृती म्हणून शिवसेनेचे नेते औरंगाबाद शहरातील सिल्लेखाना परिसरात आवर्जून सभा घ्यायचे. जो हवा तो संदेश शहरभर जायचा. या सभेत ‘हिरवा साप’ वगैरे अशी विशेषणे लावली जायची. मग प्रचाराचे टोक अधिक धारदार व्हायचे. आता शिवसेना नावासह ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले गेल्याने खान की बाण अशी प्रचाराची तोफ धडाडणार कशी, असा पेच शिवसेना कार्यकर्त्यांसमोर आहे. मात्र, याचा काही एक परिणाम होणार नाही. नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी फक्त काही सेकंद लागतील. लोक व्यक्ती आणि विचार पाहतील, असा दावा विधान परिषदेतील नेते अंबादास दानवे यांनी केला. 

उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या पैकी कोणतेही एक चिन्ह मिळाले, तरी त्याचाही तेवढाच परिणाम असेल. कारण केवळ चिन्हांवर निवडणूक लढली जात असती, तर भाजपच्या कमळाला कोठे विरोधच झाला नसता. पण मतदार नेतृत्वाचा विचार आणि व्यक्तीमधील चांगुलपणा ओळखते. त्यामुळे शिवसेनेला फारशी अडचण येणार नाही असा दावा केला जात आहे. मात्र, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघावर निवडणूक चिन्ह गोठवल्याचे परिणाम दिसून येतील, असे मानले जात आहे. कारण या तिन्ही जिल्ह्यातील मतदारसंघांत ‘खान की बाण’ या सूत्राभोवती बांधलेली आहे. मात्र, शिवसेनेतील नेत्यांना अद्यापि ते मान्य नाही. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीपुरते चिन्ह गोठविले आहे. त्यामुळे त्याच्या दूरगामी परिणामांवर लगेच चर्चा करण्यात अर्थ नाही.  असे ते सांगतात.

शिवसेनेकडून आता हिंदूत्वाच्या व्याख्येची पुनर्रचना सैन्यातील औरंगजेब ते औरंगाबाद शहराच्या नावातील औरंगजेब या दोन टोकांवरची असल्याने सेनेच्या प्रचारातील ‘खान की बाण’ हा प्रचार मुद्दाही कितपत तीव्रपणे पुढे आणला जाईल याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. या अनुषंगाने औरंगाबाद येथील जुने शिवसैनिक प्रदीप दत्त म्हणाले, हिंदूत्व म्हणजे माणुसकी. अगदी घरचे उदाहरण देतो.

‘माझी पत्नी ख्रिश्चन आहे. तिला कधीही चर्चमध्ये जाण्यापासून रोखले नाही. तिच्याशी प्रेम केले. तिच्या धर्माशी काय संबंध? तसेच जो देशाचे हित मानतो. जो हिंदूस्थानी त्यामुळे आलमगीर औरंगजेब असे म्हणणारे आणि देशाच्या रक्षणासाठी कार्य करणारा देशभक्त औरंगजेब यातील फरक आता कळतो आम्हाला. त्यामुळेच अशा निवडणूक चिन्हाच्या लढय़ातून त्यांच्या हाताला फारसे काही लागणार नाही.’ शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि पक्ष अडचणीत आल्यानंतर वयाच्या ७० व्या वर्षी ते पुन्हा कामाला लागले आहेत.

 औरंगाबाद शहरातील औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघात ‘एमआयएम’कडून मुस्लीम मते एकगठ्ठा होतात. त्यामुळे औरंगाबादचा आणि विशेषत: शहराचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा असा सवाल उपस्थित करून शिवसेनेच्या प्रचाराच्या मुद्दय़ातील बाण आता भात्यात गेल्याने निर्माण होणाऱ्या पेचातून शिवसेना आणि शिवसेनेचे नेते कसे मार्ग काढतील, याची उत्सुकता वाढीस लागल्या आहेत.