जागतिक दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास असल्याचे सांगतानाच जगाचा इतिहास माणसे मारण्याच्या प्रगतीचाच आहे! पण माणसांच्या मरण्यापेक्षा साधनसंपत्तीच्या नाशाचीच अधिक काळजी घेतली जाते. त्यामुळे दहशतवादाकडे भाबडेपणाने न पाहता आíथक साक्षरतेतून पाहायला शिकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.
उदगीरला ३० वर्षांपासून सुरू असलेल्या उज्ज्वला देशमुख स्मृती व्याख्यानमालेत ऊर्जेचे राजकारण, ऊर्जेतून निघालेला दहशतवाद या विषयावर कुबेर बोलत होते. संयोजक सुभाष देशपांडे यांनी व्याख्यानमालेचे प्रयोजन व परिचय करून दिला. कुबेर म्हणाले की, ऊर्जाधळेपणामुळे जगाच्या तुलनेत भारत मागे पडतो आहे. रॉकेल, डिझेल, पेट्रोल, दुचाकी व चारचाकी स्वयंचलित वाहनांचा शोध, वापर, त्यातील प्रगतीचा जागतिक इतिहासपट कुबेर यांनी उलगडून दाखवला. दूरदृष्टी असणारे लोक होते म्हणून प्रगतीचा आलेख वाढत गेला. मुंबईत व्हीटी रेल्वेस्थानक उभारले गेले, तेव्हा मुंबईची लोकसंख्या काय असेल व आज किती वाढ झाली आहे, तरीही लोकांची गरसोय होत नाही. विचारातील हा फरक लक्षात घेतला पाहिजे. डिझेलचा शोध लागला तेव्हाच पेटंटसाठी पाठपुरावा करून ते मिळवले गेले, याच दूरदृष्टीची समाजाला आज नितांत गरज आहे.
तेलाच्या शोधानंतर जगभर तेलाच्या आíथक लाभासाठी ज्या उठाठेवी सुरू आहेत, त्याकडे जो तो आपल्या चष्म्यातून पाहतो आहे. आपले हितसंबंध जोपासण्यास व तेलाच्या माध्यमातून जगभर आíथक साम्राज्य प्रस्थापित करण्यास अमेरिकेने ओसामा बिन लादेन, अयातुल्ला खोमेनी, सद्दाम हुसेन यांना प्यादे म्हणून वापरले. मात्र, ते शिरजोर होत आहेत हे लक्षात येताच दहशतवाद, तसेच धार्मिक कट्टरतावादी असे शब्दप्रयोग सुरू झाले. या प्रकाराकडे सजगपणे पाहण्याची दृष्टी निर्माण करण्याची गरज कुबेर यांनी विस्ताराने केलेल्या मांडणीतून व्यक्त केली.
भारताला आज ८२ टक्के तेल आयात करावे लागते. पर्यायासाठी तंत्रज्ञानातील संशोधनातून उत्तर सापडेल. पुढील शंभर वष्रे खनिजतेलास फारसा पर्याय राहणार नाही. आज तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी मागणी-पुरवठय़ाचे ढोबळ सूत्र तेलास लागू होत नाही. अमेरिकेत निवडणुका लागल्या की तेलाचे भाव वाढतील. अमेरिकेसोबत आíथक हितसंबंध जोपासणाऱ्या देशांना दहशतवादास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. सतत दहशतवादाच्या सावटाखाली वावरावे लागेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा