छत्रपती संभाजीनगर – औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर शहराजवळ आहे. औरंगजेब हा अहिल्यादनगर येथे मृत्यू पावला असून नंतर त्याचा मृतदेह येथे आणून कबर बांधण्यात आल्याचे सांगत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून सोमवारी निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
औरंगजेबाने शीख गुरु तेगबहादूर यांची कूर हत्या केली. शीख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी चिणून मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर ज्याचे वर्णन करता येणार नाही, अशी भयंकर यातनामय हत्या करण्यात आली. श्री. काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले, मधुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा विध्वंस केला.
सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले. त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदुच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली, असे निवेदनात म्हटले आहे.