बीड: परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीतून ‘ऊर्जा’ घेऊन आर्थिक आणि राजकीय भरारी घेणाऱ्या वाल्मीक अण्णा कराडच्या नावावर आतापर्यंत दहा गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हाणामारी, निवडणुकीतील गैरप्रकार असे गंभीर गुन्हे असतानाही कराडच्या केसालाही धक्का लागला नाही. अगदी फरार असतानाही त्याला दोन पोलिसांचे संरक्षण होते, ही चर्चा वाल्मीकला राजकीय वरदहस्त किती हे सांगण्यास पुरेशी आहे.

‘अण्णांना फोन करायला सांगू का?’, एवढे वाक्य म्हणून परळी आणि बीड जिल्ह्यात एखादे काम अधिकारी अगदी लगबगीने करतात, ती व्यक्ती म्हणजे वाल्मीक कराड. हातात बरेच गंडे-दोरे, आवाजात जरब असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या वाल्मीक कराडवर खंडणी, हाणामारी, अवैध जमाव जमविणे, अशा आरोपांचे दहा गुन्हे असल्याची यादी गुन्हे अन्वेषण विभागाने तयार केली आहे. खंडणीतील एक गुन्हा पवनऊर्जा कंपनीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीतून अलीकडेच दाखल झाला. या खंडणी गुन्ह्यानंतर अवदा या पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनीने काम सुरू करू नये, अशा धमक्या वारंवार येत राहिल्याचेही सांगण्यात येते.

Uttam Jankar On Mahayuti Government
Uttam Jankar : “तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण
Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय…
beed crimes walmik karad latest marathi news
बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे!
jitendra Awhad post on Walmik Karad
Jitendra Awhad : वाल्मिक कराडप्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांच्या मध्यरात्री दोन सोशल मीडिया पोस्ट; धक्कादायक दावा करत म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Image Of Prakash Ambedkar And Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस तुमचे पोलीस खाते भ्रष्ट झाले आहे”, संतोष देशमुख हत्येच्या तपासावर प्रकाश आंबेडकरांची टीका

हेही वाचा : २०२४ आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष, तापमानात आजपर्यंत सरासरी १.५ अंश सेल्सिअसने वाढ

वाल्मीक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता. पुढे धनंजय मुंडे यांचा उजवा हात अशी त्याची ओळख बनली. नेता आल्यावर लागणारा राजकीय डामडौल उभे करणारे व्यक्तिमत्त्व. गावातील छोटे अर्थकारण तुम्ही करा, पण राखेतून राजकीय ऊर्जा फक्त आम्हीच मिळवणार हा त्याचा होरा. वैद्यानाथ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शर्टच्या पाठीमागील संपूर्ण भागात गोपीनाथ मुंडे यांचे फेटाधारी छायाचित्र लावून फिरणारा, अशी त्याची ओळख. १९९० च्या दशकातला हा कार्यकर्ता पुढे खूप बदलला असे सांगणारी मंडळी परळीमध्ये पावलोपावली भेटतात. महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेतूनही त्याचे नाव चर्चेत राहिले. गोळीबाराच्या एका घटनेत तो जखमीही झाला होता. पुढे मुंडे यांच्या हयातीत परळीतून नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर काही काळ परळी नगराध्यक्षपदाचा प्रभारही त्याच्याकडे होता. आता परळी शहरात हजार कोटी रुपयांचा निधी आला, पण परळी आहे तशीच आहे. कालांतराने धनंजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांच्यातील संबंधांमध्ये दरी पडल्यानंतर वाल्मीक कराडने पुतण्याची साथ धरली.

परळीची नगरपालिका धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असताना पालिकेचा संपूर्ण कारभार वाल्मीक कराडच हाकत होता. उपनगराध्यक्षपद, गटनेता, अशी पदे त्याच्याकडे राहिली आहेत. धनंजय मुंडे हे परळीबाहेर असताना हा कार्यकर्ता पुढे ‘प्रति पालकमंत्री’ म्हणून वावरू लागला. पण खंडणी, हाणामाऱ्यांमधील सारे कार्यकर्ते वाल्मीक कराड याच्याबरोबर फिरणारे. अलीकडच्या काळात डामडौल निर्माण करण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी नियोजन करणारे कार्यकर्ते असतात. पण त्यामागेही कराडच असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा : नव्या वर्षात रस्ते विकासाला गती

‘सीआयडी’कडून चौकशी सुरू

बीडमधील पवनचक्की निर्मिती करणाऱ्या उद्याोजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणारा संशयित आरोपी वाल्मीक कराड हा मंगळवारी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयात हजर झाला. या प्रकरणात कराडची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याला घेऊन सीआयडीचे पथक बीडला रवाना झाले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ज्यांचा संबंध असेल, त्यापैकी कोणालाही सोडणार नाही. प्रत्येकावर कठोर कारवाई होईल, गुंडांचे राज्य चालू देणार नाही.

  • देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Story img Loader