छत्रपती संभाजीनगर : ऐन हिवाळयात मराठवाडयातील अनेक शहरांना पाणीटंचाईचे चटके बसत असून ७३ पैकी ६८ नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्ये सरासरी पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही शहरे तर आतापासूनच टँकरग्रस्त झाली आहेत. मराठवाडयातील धरणांमध्ये आता केवळ ४०.८० टक्के पाणीसाठा आहे. 

धरणातील पाणीसाठा कमी होण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी ढिसाळपणे केल्यामुळे तालुकास्तरावरील निमशहरी भागांत पाण्याची मोठी टंचाई आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात टंचाईचे स्रोत तपासले जात आहेत. पाणी योजना रखडल्याने दुष्काळाच्या झळा पुन्हा बसू लागल्या आहेत. मात्र, पैठण, कुंडलवाडी, किनवट, अर्धापूर, हिमायतनगर आणि नायगाव या सहा नगरपालिकांमध्ये दररोज पाणीपुरवठा होत आहे.

Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी केवळ पैठण येथे दररोज पाणीपुरवठा. कन्नड शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा, पाणीसाठा जानेवारीअखेपर्यंत कसाबसा पुरेल. गंगापूरमध्ये प्रतिदिन चार आणि तर खुलताबाद, फुलंब्रीमध्ये अनुक्रमे तीन दिवसाला पुरवठा.

हेही वाचा >>> काँग्रेसचा २७ जागांवर दावा; पक्षाच्या केंद्रीय समितीकडे प्रस्ताव सादर

जालना जिल्ह्यातील अंबडचा पाणीपुरवठा दहा दिवसांतून एकदा होतो. वितरण व्यवस्था आणि पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे असे घडते, असे सांगण्यात येते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावी भोकरदनमध्ये १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत जुई मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पूर्णत: संपला असल्याने शेलूद येथील धरणातून २५ टँकरने प्रतिदिन दोन फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत.

बदनापूर येथे सहा दिवसांनी, जाफराबाद येथे दहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायत असताना केलेली जीर्ण जलवाहिनी यास कारणीभूत आहेत. प्रकल्प अहवाल तयार करण्याची खानापूर्ती पूर्ण झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू, पालम, पूर्णा, सोनपेठ, जिंतूर आणि गंगाखेड या एकाही नगरपालिकेत दररोज पाणीपुरवठा होत नाही. यावर्षी ढालेगाव, निम्न दूधना, डिग्रज उच्च पातळी बंधारा आणि मुदगल गोदावरी नदीत फेब्रुवारीपर्यंतच पाणीसाठा असू शकेल, असे कळवण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस नोंदला गेला. परिणामी विंधन विहिरीतून टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय असणार नाही, असे कळवण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी तीन दिवसांआड एकदा पाणी येते.

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असला तरी नळ योजनांची दुरुस्ती न केल्यामुळे पाणीपुरवठयाची ओरड आहे. बीड शहराची स्थितीही वाईट असून नऊ दिवसांआड एकदा पाणीपुरवठा होतो. माजलगाव धरणातून होणारा पाणीपुरवठा कसाबसा पुरेल, पण अंबाजोगाई येथे सहा दिवसांआड, परळी येथे चार दिवसांआड, माजलगाव येथे चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो.

हेही वाचा >>> “हे पाच राजकारणी आमच्या पाठिशी उभे”, अभिनेते प्रशांत दामले यांनी सुधीर मुनगंटीवारांसमोर कोणाची नावं घेतली?

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यात आठ दिवसांआड एकदा पाणी मिळते. रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यातही सरासरी पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. औसा, देवणी, रेणापूर या पालिका क्षेत्रातही सात दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

छत्रपती संभाजीनगरसारख्या महापालिकेतही कुठे पाच दिवस तर कुठे चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. शहरातील काही भागांत मध्यरात्री ३ च्या सुमारास पाणी येते. त्यामुळे एका बाजूला थंडी आणि एका बाजूला पाणी टंचाई, अशा स्थितीत मराठवाडयातील शहरी व निमशहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जलसाठा ४०.८० टक्क्यांवर

मराठवाडयातील मोठया धरणांमध्ये ४७.८९ टक्के पाणीसाठा असून मध्यम चार प्रकल्पांत २४.५२ तर लघू प्रकल्पांत २५.६३ टक्के पाणीसाठा आहे. धरणांतील एकूण पाणीसाठा ४०.८० टक्के आहे. जायकवाडी धरणात समन्यायी पाणीवाटप झाल्याने टंचाई दूर होईल असे सांगितले जात असले तरी जीर्ण जलवाहिन्यांमुळे दुष्काळतीव्रता वाढते आहे.

Story img Loader