छत्रपती संभाजीनगर : मराठवाडय़ाच्या सर्वागीण विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचा संकल्प केला आहे. मराठवाडय़ात विकासाची कामे सुरू झाली असून त्याद्वारे मराठवाडय़ावरचा मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकून आणि दुष्काळी परिस्थितीमध्येही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाडय़ात रस्ते विकास, आरोग्य, शिक्षण, सिंचन, कृषी अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या सोहळय़ास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यासह आमदार आणि सनदी अधिकारी उपस्थित होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will remove the backwardness of marathwada testimony of chief minister eknath shinde ysh