सिद्धार्थ उद्यानातील शान असलेला पांढरा वाघ सचिनची प्राणज्योत वयाच्या सोळाव्यावर्षी शनिवारी दि.५ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास मालवली.मागील सहा महिन्यापासून आजाराशी झुंज देणारा सचिन अखेर वृद्धाप काळामुळे त्याची तब्येत खालावली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले.मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले.
सचिनचा जन्म जानेवारी महिन्यात २००४ साली भानू आणि प्रिया या जोडीतून सिद्धार्थ उद्यानातच झाला होता. सचिन प्राणी संग्रालयाचे वैभव म्हणून अनेक नागरिकांना आकर्षण वाटणारा होता. त्याला मनपाने कुटुंबातील सदस्य प्रमाणे प्रेम दिले. त्याच्यावर योग्य ते उपचार केले. त्याला आजारातून बरा करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले.
मागील सहा महिन्या पासून तो आजारी होता, त्याला चालत येत नव्हते शेवटी वय झाल्यामुळे प्राणज्योत मालवल्याने सगळ्यांनाच दुःख झाले आहे. हे सांगताना अलविदा सचिन म्हणत महापौरांच्या भावांना अनावर झाल्या. महापौर नंदकुमार घोडेलेंसह, मनपा उपायुक्त वसंत निकम, सिद्धार्थ उद्यान प्रमुख विजय पाटील हे यावेळी उपस्थित होते. सकाळी आठ वाजता पोस्टमार्टम होऊन नऊ वाजता सचिनवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान प्रमुख विजय पाटील यांनी दिली.