खाकी खपटात बंद असणारा लॅपटॉप उघडून दाखविला. अधूनमधून आम्ही हा मुलांना दाखवतो. या संगणकात सगळा अभ्यासक्रम असल्याने वापरतो, असा दावा फारोळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक करत होते. एक डेस्कटॉपही होता. पण तो सुरू केला की शॉक बसतो. त्यामुळे त्यावर तशी धूळ साचलेली. कोणी तरी ही वस्तू पाहायला आले आहे, असे म्हटल्यावर वर्गावरच्या बाईंनी त्यावरची धूळ झटकली. म्हणाल्या, ‘लोडशेडिंग असल्याने याचा फारसा उपयोग होत नाही.’ बाकी शैक्षणिक साहित्य कसे वापरतो, त्यातून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कसा घडतो आहे, हे त्यांनी तळमळीने सांगितले. मुख्याध्यापकांच्या खोलीत जाड खपटांमध्ये असणारा प्रोजेक्टर मात्र एका कोपऱ्यात पडून होता. तो काढला तर लावायचा कोठे, असा शिक्षकांना प्रश्न पडला होता. त्यामुळे प्रोजेक्टर कधी काढलाच गेला नाही. केवळ संगणकच नाही तर गणित पेटी, विज्ञानपेटी तर बरेच दिवस बंद होती. आतमध्ये चंचुपात्र, पाढय़ांच्या पट्टय़ांना जळमटे लागली होती. एक शिक्षिका म्हणाल्या, अभ्यासक्रमाचा हा भाग पुढच्या सहा महिन्यांत येणार आहे. कोपऱ्यातील काही शैक्षणिक साहित्याच्या आधारे मुले गटा-गटांत काही तरी शिकत होती. गुरुजींना विचारले, संगणकाचा काही उपयोग होतो का? गुरुजींचे उत्तर मात्र सकारात्मक होते. संगणकाचा उपयोग करता कसा, असा प्रश्न केला की, गुरुजी म्हणाले, विजेची मोठी समस्या आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा