इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या २० फुट खोल खड्ड्यात पडून ५० वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी शिवाजीनगर येथे घडली. या दुर्घटनेत शंमशौन रॉबर्ट उगले (५०) यांचा मृत्यू झाला असून ते जालन्यातील नुतनवसाहत भागातील रहिवासी असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.

मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, उगले हे शुक्रवारी सकाळी कामानिमित्त जालना येथून औरंगाबादला आले होते. शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून ते काम करत होते. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास लिफ्टच्या खड्ड्याचे काम सुरू असताना अचानक उगले यांचा तोल जाऊन ते खड्ड्यात पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार एल बी हिंगे करीत आहेत.

Story img Loader