देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना औरंगाबादमधील जिल्हा परिषदेची शाळा अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. औरंगाबादपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक कचरा डेपोमुळे हैराण झाले आहेत. शाळेच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूतील ४६ एकर परिसरात शहरातील कचरा टाकला जातो. या कचऱ्याचे तीस ते पस्तीस फुटापर्यंत उंच डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी भटकी कुत्री, माशांचे थवे आणि दुर्गंधीचे वातावरण असते. शाळा आणि कचरा डेपोमधील अंतर शंभर मीटर पेक्षाही कमी आहे. परिणामी हवेची झुळूक आली की, शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरते, असे या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका स्वाती केतकर यांनी सांगितले. सकाळी प्रार्थनेच्यावेळी कचरा डेपोकडून हवेची झुळूक आली की विद्यार्थ्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला, त्वचा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचेगी केतकर यांनी सांगितले.
औरंगाबादमधील जिल्हा परिषदेची शाळा कचऱ्याच्या विळख्यात
शाळेच्या परिसरात दुर्गंधी
Written by आप्पासाहेब शेळके
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-10-2017 at 17:24 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zilla parishads school garbage issue in aurangabad